मामाच्या गावी जाण्याचा आनंद ठरला शेवटचा प्रवास - दोन बहिणी नंतर भावाचा देखील मृत्यू

पवनची मृत्यूशी झुंज अपयशी - नियतीचा क्रूर आणि वेदनादायी खेळ

Three children killed in road accident, brother also passed away after two sisters, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

नियतीने घातलेला घाला किती क्रूर असू शकतो, याचा एक अत्यंत वेदनादायी प्रत्यय फलटण तालुक्यातील मुरुम गावात पाहायला मिळत आहे. निरा-मोरगाव मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या अवघ्या १० वर्षांच्या पवन ज्ञानेश्वर बोडरे या चिमुरड्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आधीच दोन सख्ख्या बहिणी गमावून दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या बोडरे कुटुंबाचा आणि मुरुम गावचा उरलासुरला आशेचा किरणही या निधनाने विझला आहे. एकाच घरातील तीन हसती-खेळती भावंडे अपघातात दगावल्याने संपूर्ण फलटण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.


मामाच्या गावी जाण्याचा आनंद ठरला शेवटचा प्रवास

​घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या शनिवारी सेजल (वय १७), अक्षरा (वय १५) आणि त्यांचा लहान भाऊ पवन (वय १०) हे तिघे जण मोठ्या उत्साहाने आपल्या मामाच्या गावी जाण्यासाठी मोपेडवरून निघाले होते. बालमनाला मामाच्या गावी जाण्याचा आणि सुट्ट्या घालवण्याचा मोठा आनंद होता. मात्र, चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या मोपेडला समोरून येणाऱ्या एका टेम्पोने जोरदार धडक दिली.

​हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बहिणी सेजल आणि अक्षरा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच वेळी दोन उमलत्या कळ्यांचा असा करुण अंत झाल्याने रविवारी अत्यंत शोकाकुल आणि जड अंतःकरणाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. संपूर्ण मुरुम गाव या दुःखातून सावरलेही नव्हते, तोच हा दुसरा मोठा धक्का बसला.

लहानग्या पवनची मृत्यूशी झुंज संपली

​या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात १० वर्षांचा पवन गंभीर जखमी झाला होता. बहिणींच्या मृत्यूची बातमी माहीत नसलेला हा लहानगा पुण्यात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, तर मुरुम गावातील प्रत्येकाचे हात देवाकडे प्रार्थना करत होते. सुरुवातीला बारामती आणि नंतर पुण्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, काळाला काही वेगळेच मंजूर होते. अखेर मंगळवारी उपचारादरम्यान पवनची प्राणज्योत मालवली.

बोडरे कुटुंबाचा संसार उद्धवस्त - मुरुम गाव अश्रूंमध्ये बुडाले

​एकाच घरातून अवघ्या काही दिवसांच्या अंतराने तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह बाहेर पडणे, यापेक्षा मोठे दुःख पालकांसाठी आणि समाजासाठी असूच शकत नाही. सेजल, अक्षरा आणि आता पवन यांच्या जाण्याने बोडरे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. त्यांच्या घराची हसती-खेळती बाग उजाड झाली आहे. पवनच्या निधनाची बातमी मुरुम गावात

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !