शिवशाही न्यूज जिल्हा बँक निवडणूक ब्रेकींग - डीसीसी बँकेच्या जागावाटपात कोणाची कोणत्या जागेवर बाजी? औद्योगिक विणकरचा तिढा कायम

भाजपकडे नागरी बँक व पतसंस्था, कृषी प्रक्रिया, गृहनिर्माणसह विविध जागा, राष्ट्रवादी-शिवसेनेकडे खरेदी-विक्रीसह इतर प्रवर्ग 
DCC Bank election, seats distribution, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)

औद्योगिक विणकरची जागा कोणाच्या वाट्याला जाणार?
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता कोणत्या प्रवर्गातील जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला आल्या, याचे चित्र समोर येऊ लागले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात विविध प्रवर्गांच्या जागांची विभागणी करण्यात आली असून, औद्योगिक विणकर गटाबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.

उपलब्ध माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला नागरी बँक व पतसंस्था, कृषी प्रक्रिया, इतर मागास प्रवर्ग, महिला राखीव आणि गृहनिर्माण या जागा आल्या आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला खरेदी-विक्री, अनुसूचित जाती, महिला राखीव आणि इतर मागास प्रवर्गातील जागांचा समावेश असल्याची माहिती आहे.

महायुतीच्या जागावाटपात विविध प्रवर्गांची विभागणी झाल्यानंतर आता या जागांवर कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार? प्रस्थापित नेत्यांना पुन्हा संधी मिळणार की कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, औद्योगिक विणकर गटाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार? या जागेवर कोणत्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयानंतर महायुतीच्या जागावाटपाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !