सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यान्वये जनजागृती शिबिराचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
कन्नड, प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यान्वये जनजागृती शिबिरात श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर, ता. कन्नड येथील इयत्ता ७ वीचा विद्यार्थी आदित्य शरद धुमाळ याच्या उत्कृष्ट निबंधाची विशेष दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.
अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जागरूकता या विषयांवर आदित्यने प्रभावी व विचारप्रवर्तक निबंध सादर केला. त्याच्या आशयपूर्ण लेखनाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमात समाजकल्याण अधिकारी श्रीमती लाखाडे तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. गाडेकर यांच्या हस्ते आदित्यला प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे अभिनंदन केले.
आदित्यचा हा सन्मान त्याच्या अभ्यासू वृत्तीचा, सामाजिक जाणिवेचा आणि उत्कृष्ट लेखनकौशल्याचा गौरव मानला जात आहे. या यशामुळे श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगरच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी आदित्य शरद धुमाळ याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्याला प्रेरणा व मार्गदर्शन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच पालक यांचेही सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आदित्य शरद धुमाळ यास भविष्यातही शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करत यशाची नवी शिखरे सर करता यावीत, यासाठी हार्दिक शुभेच्छा!
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा









