ज्ञानवर्धन विश्वकोश स्पर्धेत दिशा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींचे यश

जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवनात उत्साहात पार पडला

Encyclopaedia Encyclopaedia Competition, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील नियोजन भवनात उत्साहात पार पडला. या स्पर्धेत दिशा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाई येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा गौरव वाढविला.

या स्पर्धेत कु. सुहाना शहानुर शहालम मोल्ला हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर कु. गार्गी मेघा कमलाकर डेरे हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या सत्कार सोहळ्याला जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, तहसीलदार (सर्वसाधारण) चंद्रकांत शितोळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची ज्ञान आकलन क्षमता वाढते आणि विविध स्पर्धांमध्ये आत्मविश्वासाने यश मिळविण्यास मदत होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व विचारमंथन करताना मातृभाषेचा अधिक वापर करावा.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी कोणत्याही स्पर्धात्मक वातावरणात सक्षमपणे टिकून राहतात, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि ग्रंथांचे अवांतर वाचन करून भाषेचे संवर्धन व जतन करावे, तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतून विविध उपक्रम व चर्चासत्रांचे आयोजन करावे.

या यशासाठी विद्यार्थिनींना विषय शिक्षिकासौ. रुपाली सचिन चौधरी व सौ. वंदना विवेक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  प्रा.डॉ. नितीन कदम, सचिव प्रा. सौ .रूपाली कदम, मुख्याध्यापक  ताजुद्दीन सय्यद, शिक्षकवृंद व पालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थिनींच्या या यशामुळे दिशा पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामुळे दिशा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !