अजितदादांसारखा दरदष्टीचा नेता होणे नाही-प्रमोद शिंदे

जयंतीनिमित्त 'किसन वीर' वर वृक्षारोपण

Ajit Dada's Birthday, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रासह देशामध्ये आपल्या निर्भिड स्वभाव व कार्यकर्तृत्वामुळे नाव कमावलेले होते. दादांनी आपल्या कामातून जो दबदबा निर्माण केलेला होता, तो कधीही संपणारा नाही. दादांनी कायमच महाराष्ट्र राज्याचा कामांचा आलेख कसा वाढेल याकडे लक्ष केंद्रित केलेले होते. अजितदादांच्या जाण्यामळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती कदापिही भरली जाणार नसून अजितदादांसारखा दुरदृष्टीचा नेता भविष्यकाळात होणे दुर्मिळ असल्याचे मत, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केले.

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, स्व. अजितदादांची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कामगिरी ही उल्लेखनीय अशीच आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमठविलेला दिसुन येतो. बऱ्याचवेळा त्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवन विकास कामांना महत्व दिलेले आपण पाहिलेली होते. त्यामुळेच विरोधकही त्यांच्या कामाला सलाम करीत होते. एखाद्या कामात निस्वार्थीपणे झोकून देऊन काम करण्याची कला ही अजितदादांच्याकडे होती. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन यापुढील काळात आपल्याला काम करावे लागणार असुन पक्षवाढीच्या अनुृषंगाने लक्ष द्यावे लागणार आहे. किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्यास आर्थिक मदत केल्यामुळेच खऱ्या अर्थाने उभारी मिळाली असुन याचे सर्व श्रेय स्व. अजितदादा पवार यांचेच आहे. नामदार मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्यासमवेत आपणही स्व. अजितदादा पवार यांनी दाखविलेल्या आदर्शावर पुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही प्रमोद शिंदे यांनी सांगितले. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर सप्तपर्णी व पिंपळ या वृक्षाचे रोपण करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे संचालक रामदास गाढवे, संजय कांबळे, प्रकाश धुरगुडे, आत्माराम सोनावणे, निवास शिंदे, पोपट जगताप, कांतीलाल पवार, राजेंद्र सोनावणे, नितीन निकम, शामराव गायकवाड, विजय शिंगटे, अमृत गोळे, प्रमोद वारागडे, रघुनाथ भोसले, राम पोळ, सर्जेराव पवार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

     ---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !