संततधार पावसामुळे पसरणीत घराची भिंत कोसळली

सुदैवाने जीवितहानी टळली

The house wall collapsed due to the rain, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पसरणी येथील माल्कमपेठ बाग परिसरात राहणाऱ्या रमेश सणस यांच्या घराची भिंत दुपारच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने, भिंत कोसळली तेव्हा परिसरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, यामुळे सणस यांच्या घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

     घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी गावचे तलाठी यांना तात्काळ घटनास्थळी पाचारण केले. तलाठ्यांच्या उपस्थितीत झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा करण्यात आला आहे.

"सणस कुटुंबावर ओढवलेले हे संकट मोठे आहे. पीडित कुटुंबाला शासनाकडून लवकरात लवकर आणि योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी माझे शर्थीचे प्रयत्न राहतील," अशी ग्वाही यावेळी स्वप्निल गायकवाड (सदस्य, पंचायत समिती) यांनी दिली.

     या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पावसामुळे जुन्या आणि कमकुवत झालेल्या घरांच्या भिंतींबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !