भुईंज शाखेत आयोजित सहकार सप्‍ताहात बोलताना प्रणिता जाधव शेजारी मनोज सोनावणे.

शेतकर्‍यांच्‍या प्रगतीत सहकार क्षेत्राच मोठे योगदान : प्रणिता जाधव

Cooperation Week Activities, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाराष्‍ट्राने देशाला सहकार चळवळ दिली आहे. सहकारानेच राज्‍याने व जिल्‍ह्याने प्रगती केली आहे. सातारा जिल्‍हा बँक ही देशात अग्रेसर असून शेतकर्‍यांच्‍या प्रगतीचा ती कणा आहे. शेतकर्‍यांच्‍या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा आहे. शेतकर्‍यांनी जिल्‍हा बँकांच्‍या व सहकार क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन एफएलसी समन्‍वयक प्रणिता जाधव यांनी केले. 

सातारा जिल्हा बँकेच्यावतीने आयोजित सहकार सप्ताह उपक्रमांतर्गत भुईंज शाखेत आयोजित सहकार मेळाव्‍यात त्‍या बोलत होत्‍या. जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष खा. नितीन पाटील, उपाध्‍यक्ष अनिल देसाई, सीईओ डॉ. राजेंद्र सरकाळे, व्‍यवस्‍थापक राजेंद्र गाढवे, राजेंद्र भिलारे, विभागीय विकास अधिकारी संजय मांढरे, यांच्‍या मार्गदर्शनाखाली या सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी भुईंज शाखा प्रमुख मनोज सोनावणे, विकास अधिकारी सागर जाधव, ग्राहक, शेतकरी, महिला बचतगट सदस्य उपस्थित होते. या मेळाव्यात आणि नागरिकांना बँकेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी प्रणिता जाधव यांनी बँकेच्या ठेवी व कर्ज योजना, डिजिटल बँकिंग, यूपीआय, रुपे कार्ड, केसीसी कार्ड, सायबर सुरक्षा, विविध विमा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच आर्थिक समावेशन योजनांची माहिती देण्यात आली. शेतकरी व ग्राहकांनी योजनांविषयी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !