शिरगाव मध्ये जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानातर्फे 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण

‘वृक्षारोपण महाअभियान २०२६’; मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Plantation campaign, Satara, wai, shivshahi news.

 शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून शिरगाव (ता. वाई) येथे आयोजित ‘वृक्षारोपण महाअभियान २०२६’ या पर्यावरणपूरक उपक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद  पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित केले.

याप्रसंगी बोलताना मंत्री मकरंद  पाटील म्हणाले, "‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या संतवचनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत सातारा जिल्ह्यातील भक्तगण, पर्यावरणप्रेमी, सेवाभावी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ५,००० वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण होत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे."

ते पुढे म्हणाले की, वृक्षलागवड ही केवळ आजची गरज नसून भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि समृद्ध निसर्गाचा अमूल्य ठेवा निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. अशा जनहिताच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडते.

या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. 

तसेच पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देत, "प्रत्येकाने एक वृक्ष लावूया, त्याचे संगोपन करूया आणि हरित, समृद्ध महाराष्ट्र घडवूया," असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आरएफओ  सविता रेडी पाटील, वनपाल राजलक्ष्मी वीर, वनरक्षक साक्षी शिंदे, वनसेवक विजय घाडगे, अमोल इथापे,

 राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष  बाळासाहेब सोळसकर, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर भोसले, माजी सरपंच धर्मराज भोसले, संदीप पिसाळ, नितीन भोसले, मानसिंग भोसले, रामचंद्र भोसले,  नंदकुमार भोसले, विनायक भोसले, स्वप्निल भोसले, दादा घाडगे, जनार्दन भोसले, स्वामी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !