१६ कुटुंबांतील ६१ जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )
जावली तालुक्यातील म्हाते-मुरा गावातील काही भागात आज झालेल्या भूस्खलनामुळे जमिनीला मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून खबरदारीचा उपाय म्हणून धोक्याच्या क्षेत्रातील १६ कुटुंबांतील एकूण ६१ नागरिकांचे तात्पुरते सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
या नागरिकांना सध्या त्यांच्या नातेवाईकांकडे सुरक्षितपणे हलविण्यात आले असून महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिसरावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. भूस्खलनामुळे जमिनीला मोठ्या भेगा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आवश्यकतेनुसार पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










