गुन्हे प्रकटीकरण शाखेने या मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले.
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हरवलेले मोबाईल शोधण्याच्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत ६ लाख २५ हजार रुपये किमतीचे २५ स्मार्टफोन शोधून त्यांच्या मूळ मालकांकडे परत सुपूर्द केले.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला हरवलेले मोबाईल शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार डी.बी. पथकाने CEIR पोर्टल तसेच इतर तांत्रिक साधनांचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील मोबाईलधारकांशी सातत्याने संपर्क साधला. पथकाच्या चिकाटीच्या प्रयत्नांमुळे शाहूपुरी परिसरातून हरवलेले एकूण २५ स्मार्टफोन हस्तगत करण्यात यश आले.
यापुढेही अशाच प्रकारची मोहीम सातत्याने राबवून नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून देण्याचा प्रयत्न सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली.
या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी शैलेंद्र गोवेकर तसेच पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ आणि रोहित बाजारे यांनी सहभाग घेतला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



