धोम व धोम-बलकवडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ - सध्या कोणताही विसर्ग नाही

धरणात ८,६८१ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

Increase in water storage in the dam, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धोम व धोम-बलकवडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, दोन्ही धरणांतून सध्या कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

धोम धरणाची पाणीपातळी सायंकाळी ५ वाजता ७३९.४० मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण (Gross) पाणीसाठा २१६.६६ दशलक्ष घनमीटर (७.६५ टीएमसी) असून तो ५६.६७ टक्के आहे. तर उपयुक्त (Live) पाणीसाठा १६५.३९ दशलक्ष घनमीटर (५.८४ टीएमसी) म्हणजे ४९.९६ टक्के इतका आहे.

धोम परिसरात आज १० मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान ४९९ मिमी झाले आहे. धरणात ८,६८१ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. मात्र स्पिलवे, वीजगृह, कालवे, डीएलबीसी, डीआरबीसी, गळती तसेच आसरे बोगद्यातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नसून एकूण विसर्ग शून्य क्युसेक आहे.

दरम्यान, धोम-बलकवडी धरणाची पाणीपातळी ८०४.९० मीटर इतकी झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ७९.४५१ दशलक्ष घनमीटर (२.८१ टीएमसी) असून तो ६८.७७ टक्के आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ७६.०६१ दशलक्ष घनमीटर (२.६९ टीएमसी) म्हणजे ६७.८३ टक्के इतका आहे.

धोम-बलकवडी परिसरात आज ३५ मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान १,४५५ मिमी झाले आहे. धरणात ४,४१३ क्युसेक पाण्याची आवक सुरू असली तरी ICPO, डिस्चार्ज व्हॉल्व्ह, स्पिलवे आणि जललक्ष्मी या सर्व माध्यमांतून सध्या कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाचा एकूण विसर्ग शून्य क्युसेक आहे.

दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याने जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, पुढील पर्जन्यमानानुसार जलसंपदा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !