जागतिक डॉक्टर्स डे निमित्त डॉ. गणेश सोनकिरकर यांचा करण्यात आला गौरव
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
जागतिक डॉक्टर्स डे निमित्ताने एक जुलै रोजी कर्ण फाउंडेशन सातारा यांच्या वतीने ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. गणेश सोनकिरकर यांचा श्रीरंग काटेकर - जनसंपर्क अधिकारी गौरीशंकर नॉलेज सिटी सातारा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन नुकताच गौरव करण्यात आला.
सत्कार प्रसंगी श्रीरंग काटेकर म्हणाले की गेली ३० वर्षे डॉक्टर सोनकिरकर हे ग्रामीण तसेच डोंगराळ भागात करत असलेली रुग्णांची सेवा आदर्शवत व अभिमानास्पद आहे. पैशांपेक्षा सेवेला महत्त्व देऊन अत्यंत माफक दरात वैद्यकीय सेवा देत त्यांनी वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा आणि माणुसकी जपली आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून डॉ. सोनकिरकर यांनी केलेले काम उच्चतम तर आहेच आणि थेट हृदयाला भिडणारे आहे.
कर्ण फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शेखर कोल्हापूरे म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर सोनकिरकर यांनी केलेले योगदान मोलाचे असून त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाचा गौरव करण्यासाठी हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी डॉक्टर सोनकिरकर यांनी सत्काराला उत्तर देत भविष्यातही समाजसेवा आणि रुग्णसेवा अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. व कर्ण फाउंडेशनचे आभार मानले.
कार्यक्रमास कर्ण फाउंडेशनचे कुमार लोखंडे, हेमंत जोशी, दत्तात्रय सांगलीकर, मधु गव्हाणे, विजयकुमार कुलकर्णी, सौरभ जाधव, अन्वेशा कोल्हापुरे, सुनीता कोल्हापुरे, सविता लिंबकर, विजय भोईटे ,राजाराम मोहिते आदी उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



