डॉक्टर्स डे निमित्त माजी सैनिकांच्या डॉक्टर पुत्रांचा गौरव- आदर्श पित्याचा सन्मान

चव्हाण कुटुंबाचे सर्व स्तरांतून अभिनंदन 

Doctor son felicitated on Doctors' Day, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

डॉक्टर दिनानिमित्त सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कराड तालुक्यातील करवडी येथील निवृत्त भारतीय नौदलाचे जेसीओ अशोक चव्हाण यांच्या दोन्ही डॉक्टर पुत्रांचा तसेच आदर्श सैनिक व आदर्श पिता म्हणून अशोक चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 भारतीय नौदलात प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर जेसीओ पदावरून सेवानिवृत्त झालेले अशोक चव्हाण यांनी सैनिकी शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेची मूल्ये जपत आपल्या कुटुंबालाही शिक्षणाची प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे दोन्ही पुत्र डॉ. मंदार अशोक चव्हाण आणि डॉ. मयंक अशोक चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन करून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला असून समाजातील सर्व स्तरांतील रुग्णांची सेवा करत आहेत.

     डॉक्टर्स डेच्या निमित्ताने सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा संरक्षण समितीचे शासकीय सदस्य प्रशांत कदम आणि सातारा जिल्हा परिषद सदस्य सागरजी शिवदास यांच्या हस्ते दोन्ही डॉक्टरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

     याचवेळी, आदर्श सैनिक आणि आदर्श पिता म्हणून अशोक चव्हाण यांचाही कराड तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष सदाशिव नागणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मुलांना उच्च शिक्षणाबरोबरच देशसेवा, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांची शिकवण देऊन समाजासाठी सक्षम नागरिक घडविल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

     या सन्मान सोहळ्यामुळे माजी सैनिक परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या चव्हाण कुटुंबाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

   -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !