वाईत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

नगरसेवक सचिन सावंत यांचा स्तुत्य उपक्रम

Distribution of school supplies,Corporator Sachin Sawant, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

सोनगिरवाडी प्रभागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा जाहीर कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात संपन्न झाला. वाई नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सावंत यांच्या वतीने सोनगिरवाडी येथील ज्योतिबा मंदिर परिसरात या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास वाईनगरीचे नगराध्यक्ष अनिल सावंत, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष डॉ. सतीश बाबर, नगरसेविका नूतन मालुसरे, दिपाली सावंत, सरिता सावंत, तेजल सावंत, युवा नेते श्रीकांत सावंत, प्रकाश जाधव, लक्ष्मण सावंत, अर्जुन मगर, गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

     कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष अनिल सावंत, पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी आणि जि.प. सदस्य बापूसाहेब शिंदे यांनी नगरसेवक सचिन सावंत यांच्या या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. "गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास पात्र आहे," असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

     युवा नेते श्रीकांत सावंत यांनी पालकांना दिलासा देताना सांगितले की, "शाळेसंदर्भात विद्यार्थी आणि पालकांना भविष्यात कसलीही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू आणि आवश्यक ती सर्व मदत केली जाईल."

     प्रास्ताविक करताना नगरसेवक सचिन सावंत यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. "शिक्षणापासून एकही गरजू विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी हा छोटासा प्रयत्न असून, हा मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम यापुढे दरवर्षी राबवला जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.

     कार्यक्रमाची सुरुवात तेजल सावंत यांच्या स्वागतपर मनोगताने झाली. या प्रसंगी प्रभागातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आकर्षक स्कूल बॅग, पाण्याची बॉटल आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हक्काचे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

     नगरसेवक सचिन सावंत यांनी राबवलेल्या या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे वाई शहरासह संपूर्ण तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !