माळशिरस तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना - विहिरीत पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

घटनेमुळे संपूर्ण परिसरात पसरलीय शोककळा

Baby dies after falling into a well, malshiras, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)

आईच्या शोधात घराबाहेर पडलेल्या ३ वर्षीय यश वैभव कांबळे या चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धर्मपुरी येथे घडली. शनिवारी (ता. ११) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

​नेमकी घटना काय?

वैभव कांबळे हे आपल्या कुटुंबासह धर्मपुरी येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी दुपारी वैभव यांच्या पत्नी मोनाली या जनावरांसाठी गवत कापण्यासाठी शेतात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना घरीच थांबण्यास सांगितले होते. मात्र, आईच्या मागोमाग जाण्यासाठी चिमुकला यश कोणालाही न सांगता घराबाहेर पडला. आईला शोधत असताना नेमके काय घडले, हे कोणालाही समजले नाही.

​आईचा भावनिक संघर्ष

गवत घेऊन घरी परतल्यानंतर मोनाली यांना यश घरात दिसून आला नाही. त्यांनी तातडीने नातेवाइकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधाशोध सुरू असताना घराजवळील विहिरीत यश पाण्यावर तरंगताना दिसला. आपल्या मुलाला पाहून मातेच्या काळजाचा ठोका चुकला. क्षणाचाही विलंब न करता, पोहता येत नसतानाही मोनाली यांनी मुलाला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली.

​ग्रामस्थांची धाव, पण नियतीचा घात

मोनाली यांच्या आरडाओरडीचा आवाज ऐकून जवळच गुरे चारणारे नवनाथ जाधव आणि परिसरातील महिलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखून आई व मुलाला विहिरीतून बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत यशचा मृत्यू झाला होता. या घटनेने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !