श्री भैरवनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

योगातून निरोगी जीवनाचा संदेश

International yoga day, bhairavnath school,rayat shikshan Sanstha, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवनाथ विद्यालय, पसरणी येथे रविवारी दि. २१ जून, 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि श्री भैरवनाथ विद्यालय, पसरणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

यावेळी योग प्रशिक्षक  किरण राजेंद्र शिर्के व आशुतोष राजेंद्र शिर्के यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम, विविध योगासने, सूर्यनमस्कार इत्यादी प्रकारांची विद्यार्थी समवेत प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच संतुलित आहाराचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही जपले जाते, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक  ए. एल. पवार यांनी योग मार्गदर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी व सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमास विद्यालयातील शिक्षक बी. डी. बनसोडे, डी. सी. आखाडे, एस. एस. क्षीरसागर, पी. आर. सूर्यवंशी,  शुभांगी मर्ढेकर मॅडम,  आयुष मर्ढेकर व अंकित शिर्के, दत्तात्रय महांगडे बापू  यांची उपस्थिती लाभली.

योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश देण्यात आला.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !