द.ह. कवठेकर प्रशालेचा विद्यार्थी पुस्तकी ज्ञानाने तर समृद्ध आहेच पण तो सुसंस्कृत सुध्दा आहे - मानद सचिव सु.र. पटवर्धन

द.ह. कवठेकर प्रशालेत गुणवंतांचा 'हलगीच्या तालावर' शाही गौरव
१००% गुण मिळवणारा अथर्व वाडेकर ठरला राज्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी

Great success, D.H. Kavthekar prashala, school, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
"या शाळेचा विद्यार्थी पुस्तकी ज्ञानाने समृद्ध तर होतोच, पण तो तितकाच सुसंस्कृत आणि संवेदनशीलही होतो," असे गौरव उद्गार पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सु.र. पटवर्धन यांनी काढले. द.ह. कवठेकर प्रशालेच्या आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याच्या मंचावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
द.ह. कवठेकर प्रशालेच्या प्रांगणात वर्ष २०२५-२६ मधील एसएससी (SSC) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून सचिव सुधीर पटवर्धन, सदस्य डॉ. मिलिंद जोशी, संजय कुलकर्णी, मुख्याध्यापक व्ही. एम. कुलकर्णी, पर्यवेक्षक आर. एस. कुलकर्णी, जे. एम. शेलार आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राणीताई लेंगरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

शाही मिरवणुकीने सोहळ्याचा प्रारंभ
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांची हलगीच्या तालावर, डोक्याला फेटे बांधून प्रशालेच्या परिसरामध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात निघालेली ही मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरली. मिरवणुकीनंतर विद्यार्थी आणि पालकांना सन्मानाने व्यासपीठाकडे आणण्यात आले. येथे सर्व गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.

शाळेचा निकाल ९४ टक्के; ३६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण
यावर्षी द.ह. कवठेकर प्रशालेतून एकूण २५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ९४ टक्के लागला आहे. प्रशालेची यशाची परंपरा कायम राखत एका विद्यार्थ्याने १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तसेच तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.

विशेष प्राविण्य मिळवलेले गुणवंत विद्यार्थी
अथर्व वाडेकर: १००% (राज्यात प्रथम)
सानवी कलडोहणे: ९९.६०%
सार्थक लेंगरे: ९९.२०%
शर्वरी नखाते: ९८.४०%
धनश्री निघाले: ९७.४०%
सई तेंडुलकर: ९७.२०%

अथर्वच्या दातृत्वाने जिंकली मने
कार्यक्रमात राज्याचा मानकरी ठरलेल्या अथर्व वाडेकर याने आपल्या कृत्याने उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आणि सुसंस्कृतपणाचे उत्तम उदाहरण घालून दिले. अथर्वला 'टार्गेट पब्लिकेशन'कडून मिळालेले १०,००० रुपयांचे रोख बक्षीस त्याने स्वतःकडे न ठेवता, पुढील वर्षांतील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून वाटण्यासाठी शाळेला देणगी स्वरूपात सुपूर्द केले. त्याच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक झाले आणि संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन केले.

मान्यवरांची मनोगते
मुख्याध्यापक व्ही. एम. कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात शाळेच्या यशाचा चढता आलेख आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने अथर्व वाडेकर याने तर पालकांच्या वतीने सिद्धेश्वर लेंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे सचिव सुधीर पटवर्धन यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे अत्यंत नेटके सूत्रसंचालन शिक्षक राजेश खिस्ते यांनी केले, तर दिवाण सर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सविस्तर परिचय करून दिला. शेवटी उपमुख्याध्यापक एस. एस. विश्वासे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !