अमृतवाडी ग्रामस्थांनी केला सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अंतर्गत झालेल्या शासन भरती प्रक्रियेमध्ये अमृतवाडी (तालुका वाई) येथील अमर संगीता संजय भाडळकर याची फायरमन पदासाठी निवड झाली. यावेळी अमृतवाडी ग्रामस्थांच्या हस्ते त्याचा यथोचीत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मराठा महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील उपाध्यक्ष अनिल करंदकर उपाध्यक्ष बजरंग चौधरी किसनवीर सहकारी साखर कारखाना व्हा चेअरमन प्रमोद शिंदे,सहकार बोर्डचे सातारा माजी चेअरमन कांतीलाल पवार भुईंज पोलीस स्टेशन सपोनी पृथ्वीराज ताटे,जिल्हा सातारा राष्ट्रवादी सरचिटणीस निवास शिंदे वाई नगरपालिका नगरसेविका सौ दिपा सावंत,भाजप जिल्हा सरचिटणीस अमोल गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, भोर पोलीस स्टेशन पीएसआय सौ शीला पवार, नवलाई ग्रामीण पतसंस्था मनोहर निकम सरपंच सचिन रत्नपारखे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील निकम माजी सरपंच पांडुरंग कुंभार उडतारे माजी सरपंच स्वप्निल निंबाळकर दैनिक पुढारी पत्रकार जयवंत पिसाळ, दैनिक ऐक्य किशोर रोकडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे महादेव हगवणे,जावली तालुका अध्यक्ष सुनील धनावडे,खंडाळा तालुका अध्यक्ष प्रवीण वीर, व्हाईस ऑफ मीडिया सातारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मोहन खुडे,नवदर्पण संपादक संदीप माने, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिर्के,तलाठी मेढा चंद्रकांत धनावडे, खंडाळा तालुका अंकुश पवार, तसेच भिलार कासवंड वाई पाचवड अमृतवाडी सातारा सर्व ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस स्टेशनचे सपोनीस पृथ्वीराज ताटे म्हणाले युवकांनी आपली जिद्द चिकाटी आणि खडतर परिश्रम करण्याची तयारी असल्यास यश नक्कीच मिळते हे अमर भाडळकर यांनी दाखवून दिले आहे याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते अमर भाडळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार कैलास फुड्स उद्योजक व माजी सरपंच दत्ताशेठ बांदल यांनी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



