आनंदराज आंबेडकर यांचे स्वप्न, विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
रिपब्लिकन सेनेचा आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता केवळ ग्रामपंचायत सदस्य नव्हे तर नगरसेवक, आमदार, खासदार होऊन तो सत्तेत बसला पाहिजे हे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचे स्वप्न आहे. असे प्रतीपादन राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे युवानेते ऍड. अमन आनंदराज आंबेडकर यांनी केले. दरम्यान त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतक करत शाब्बासकिची थाप दिली.
सातारा जिल्हा रिपब्लिकन सेना पदाधिकारी निवडी तसेच कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम सातारा येथील निर्मल हॉलमध्ये अमन आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी, राज्य सचिव सोमनाथ भोसले, राज्य संघटक आनंद मोहन, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे, कामगार आघाडी अध्यक्ष डॉ. शंकर माने, युवक प्रदेशाध्यक्ष किरण धोंगडे, विमल चारीटेबल ट्रस्टचे अमोल रोकडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना, रिपब्लिकन पार्टीतील अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला.
अमन आंबेडकर पुढे म्हणाले, रिपब्लिकन सेनेची ताकद वाढदिण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पिंजून काढत आहोत. आंबेडकर चळवळीतील कार्यकरर्त्यानी केवळ कार्यकर्ता म्हणुन काम केले आहे. त्यांनी आता कित्ती दिवस कार्यकर्ता म्हणुन काम करायचे त्यांनी सत्तेत बसले पाहिजे. आनंदराज आंबेडकरांना स्वतःसाठी आमदारकी, खासदारकी नको आहे. माझ्या रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता केवळ ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समीती सदस्य, नगरसेवक नव्हे तर आमदार, खासदार झाला पाहिजे असे त्यांचे स्वप्न आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला मिळवून दिले आहे. हे आरक्षण आता मनुवादी भाजप सरकारला काढून घ्यायचे आहे. हिंदू -मुस्लिम, मराठा - ओबीसी समाजात त्यांनी भांडणे लावली आहेत. आता उपवर्गीकरणावरून बौद्ध विरुद्ध मातंग तसेच इतर समाजामध्ये भांडण लावून मागासवर्गीय समाजाचे आरक्षण काढून घ्यायचा त्यांचा डाव आहे. म्हणुन आता आपण सावध झाले पाहिजे. असेही अमन आंबेडकर यावेळी म्हणाले. रमेश उबाळे पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढसाठी परिसश्रम घेत आहेत. त्यांनी पक्षाच्या माध्यमातुन जिल्हा परिषद-पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूक लढविल्या आहेत. त्यांनी आपले काम असेच सुरू ठेवले पाहिजे.
रमेश उबाळे म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष अनंतराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला आहे. त्यांचे मी स्वागत करतो त्यांना मी स्वतःचा भाऊ, कुटूंबातील सदस्य म्हणुन पाहिजे ती मदत करेन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करेन. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपण गाव तेथे रिपब्लिकन सेना अभियान राबवून पक्षाच्या शाखा उभ्या करु. आपण सर्वच समाज घटकात काम करत असून युपीएससी, एमपीएससीच्या गरजू अनेक विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासाची पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. सुशीलकुमार सूर्यवंशी यांचेही भाषण झाले.
यावेळी लोकसभा अध्यक्ष अक्षय कांबळे, जिल्हा महिला लोकसभा अध्यक्ष पूजा बनसोडे, युवा लोकसभा अध्यक्षपदी विशाल वायदंडे, लोकसभा मातंग आघाडी अध्यक्षपदी साईनाथ खंडागळे, अल्पसंख्याक लोकसभाअध्यक्षपदी जमीर शेख, अल्पसंख्यांक महिला आघाडी अध्यक्ष आयेशा पटणी, कामगार आघाडी अध्यक्ष आजय घाडगे, जिल्हा महासचिव पदी नितीन रोकडे यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना अमन आंबेडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
30 जून रोजी आरक्षण वाचवीण्यासाठी मुबंईला हजर राहिले पाहिजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास आरक्षण उपलब्ध करुन दिले आहे. हे आरक्षण टीकवीण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे. बौद्ध, मातंग असा वाद करण्याची वेळ नाही. येत्या 30 तारखेला समाज, पक्ष विसरून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराराष्ट्रातील मागासवर्गीय घटकातील लोकांनी उपवर्गीकरणाविरोधातील महा मोर्चा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुबंई येथे होणार आहेत या मोर्चामध्ये उपस्थित सहभागी व्हावे असे आवाहनही अमन आंबेडकर यांनी यावेळी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



