धडाकेबाज पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती - गडचिरोलीत होणार नियुक्ती

३२ वर्षांची निष्कलंक सेवा, २०० हून अधिक पुरस्कार; दौंडच्या सुपुत्राचा बहुमान

Promotion as deputy superintendent of police, Dhananjay jadhav, Daund, Pune, ahilya Nagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, दौंड
राज्य शासनाच्या वतीने पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि कर्मठ शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना पोलीस उपअधीक्षक (DySP) पदी पदोन्नती जाहीर झाली आहे. राज्य सरकारने आज राज्यातील एकूण २२४ पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीचे आदेश जारी केले असून, यामध्ये जाधव यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश आहे. या पदोन्नतीसह त्यांची धानोरा (जि. गडचिरोली) येथे नव्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
धनंजय जाधव हे मूळचे गिरिम (ता. दौंड, जि. पुणे) येथील रहिवासी असून, सध्या ते अहिल्यानगर येथे कार्यरत आहेत.

३२ वर्षांची प्रदीर्घ अन् गौरवशाली कारकीर्द
सन १९९३ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे धनंजय जाधव हे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून पोलीस दलात दाखल झाले होते. १९९४ मध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली, पुणे शहर, सोलापूर ग्रामीण, कोल्हापूर आणि अहिल्यानगर अशा विविध संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवला.
त्यांच्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत शासनाने व पोलीस विभागाने त्यांना तब्बल २०० पेक्षा जास्त बक्षिसे व पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

सेवा अभिलेखाच्या पडताळणीनंतर शासनाचा निर्णय
सर्व संबंधित पोलीस निरीक्षकांचा सेवा कालावधी आणि सेवा अभिलेख (सर्व्हिस रेकॉर्ड) यांची अत्यंत कडक पडताळणी आणि छाननी करून पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्य शासनाकडे अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारेच ही पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली आहे.

वैयक्तिक कारणास्तव नाकारली होती आधीची पदोन्नती
दरम्यान, ऑगस्ट २०२३ मध्ये देखील राज्य शासनाने धनंजय जाधव यांना पदोन्नती देऊ केली होती, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी त्यावेळी ही पदोन्नती नाकारली होती. अखेर त्यांच्या निष्कलंक सेवेचा सन्मान करत शासनाने पुन्हा त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. जाधव हे ऑगस्ट २०२९ अखेर पोलीस सेवेतून निवृत्त होणार आहेत.

शासनाचे मानले आभार
या सर्वोच्च पदोन्नतीबद्दल धनंजय जाधव यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला आहे. "राज्य शासनाने माझ्या कामाची पावती देत मला जनतेची आणखी प्रभावीपणे सेवा करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे," अशा भावना व्यक्त करत त्यांनी शासनाचे विशेष आभार मानले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !