पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंतरराज्य गुन्हेगारीविरोधातील महत्त्वाचे यश मिळाले
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथे दाखल असलेल्या अंमली पदार्थ प्रकरणातील मुख्य आरोपीला भुईंज पोलिसांनी आनेवाडी टोलनाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतल्याची धडाकेबाज कारवाई केली. सातारा जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंतरराज्य गुन्हेगारीविरोधातील आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील ड्रग्स प्रकरणातील आरोपी कार मधून सातारा बाजूकडून पुण्याकडे जात असल्याची माहिती भुईंज पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या पथकाने आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचून संशयित वाहन अडविले.
वाहनाची तपासणी व चौकशी केली असता संबंधित इसमाने आपले नाव शंमूगम श्रीनिवास (रा. गणपती नगर, चेन्नई, तमिळनाडू) असे सांगितले. त्याची पडताळणी केल्यानंतर तो जी-1 विपेरी पोलीस ठाणे, चेन्नई येथे दाखल असलेल्या गुन्हामधील मुख्य आरोपी असल्याचे उघड झाले. त्याच्यावर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे.
यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला पोलीस निरीक्षक रविचंद्रन एम. व त्यांच्या चेन्नई पोलिसांच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल इंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स.पो.नि. पृथ्वीराज ताटे तसेच पोलीस अंमलदार सुशांत धुमाळ, सोमनाथ बल्लाळ, अजित पवार आणि रोहन चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ स्तरावरून कौतुक करण्यात आले असून, भुईंज पोलिसांच्या तत्परतेमुळे आंतरराज्य गुन्हेगाराला पकडण्यात यश आल्याची भावना व्यक्त होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा![]()



