माजी आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांच्या 2024 साला पासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश - दिघंची जिल्हा हद्द ते वाणी चिंचाळे भोसे रस्त्यासाठी 342 कोटी मंजूर

या रस्त्याचे श्रेय कोणीही घेवून नये हे श्रेय अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांचेच - जि.प.सदस्य दादासाहेब लवटे

Fund sanction for road, MLA sahaji bapu Patil, CM Devendra fadnavis, minister ShivendraRaje Bhosle, sangola, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सांगोला

सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी मा.आम.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांच्या विशेेष प्रयत्नामुळे सांगली जिल्हा हद्द दिघंची ते खवासपूर-लोटेवाडी-सोनलवाडी-एखतपूर-सांगोला-वाढेगाव-मेडशिंगी आलेगाव-वाकी घेरडी-वाणी चिंचाळे ते भोसे रस्ता हा राज्य मार्ग 386 कि.मी. या रस्त्यासाठी  342 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी तालुक्यातील विविध गावांमधील मुख्य  रस्त्यांच्या सुधारणेसाठी वापरला जाणार आहे. या रस्त्यासाठी मा.आम.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील हे 13 मार्च 2024 पासून आज अखेर प्रयत्न करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या रस्त्याच्या निधीसाठी फक्त अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनीच प्रयत्न केले असून कोणीही याचे श्रेय घेवून नये असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख व जि.प.सदस्य दादासाहेब लवटे यांनी पुराव्यानिशी केले आहे.

13 मार्च 2024 साली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांना दुरध्वनीवरून सांगोल्यातील 30 कि.मी चा रस्ता तातडीने मंजूरीसाठी कळवावा असे सांगितले. त्यानंतर  माजी आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनी लेखी पत्र देवून राज्य मार्ग क्रमांक 386 अंतर्गत दिघंची जिल्हा हद्द ते खवासपूर-लोटेवाडी-सोनलवाडी-एखतपूर-सांगोला-वाढेगाव-मेडशिंगी आलेगाव-वाकी घेरडी-वाणी चिंचाळे ते भोसे रस्ता पर्यंत 350 कोटी रूपयांचा निधीची मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी मा.आम.अ‍ॅड.शहाजीबापू यांच्या लेखी पत्रावर या रस्त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परत मंत्री मंडळ बदलले  दि. 4 ऑगस्ट 2025 रोेजी राज्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मा.आम.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांच्या लेखी पत्रावर निधी उपलब्ध करून निधीची तरतूद केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अ‍ॅशियन डेव्हल्पमेंट बोर्ड या बँकेच्या पैशातून हा रस्ता मंजूर केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी निधी उपलब्धकरून देण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे त्यांचेही दादासाहेब लवटे यांनी आभार मानले.

राज्य मार्ग क्रमांक 386 कि.मी 41/450 ते  66/360 मध्ये दिघंची जिल्हा हद्द ते खवासपूर-लोटेवाडी-सोनलवाडी-एखतपूर-सांगोला-वाढेगाव-मेडशिंगी आलेगाव-वाकी घेरडी-वाणी चिंचाळे ते भोसे रस्ता रूंदीकरणासह सुधारणा करणे अशी 350 कोटी रूपयांची मागणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तात्काळ मंजुरी देवून निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे या रस्त्यांचे श्रेय तालुुक्यातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींना व आजी-माजी लोकप्रतिनिधींना घेता येणार नाही. या रस्त्यासाठी मा.आम.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनी मार्च 2024 पासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे श्रेय फक्त मा.आम.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनाच द्यावे लागेल असेही शिवसेनेचे तालुका प्रमुख व जि.प.सदस्य दादासाहेब लवटे यांनी लेखी पत्राच्या व मंजुरी मिळालेल्या पत्राच्या पुराव्यानिशी सांगितले आहे.

फोटो मा.देवेंद्र फडणवीस, मा.एकनाथ शिंदे, शिवेंद्र राजे भोसले व मा.आम. अ‍ॅड.शहाजीबापू पाटील, मा.जि.प.सदस्य दादासाहेेब लवटे 

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !