ग्रामपंचायतीने जनजागृती करून राबवलेल्या मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईंज गावांत व परिसरात प्लॅस्टिक हटाव साठी ग्रामपंचायतीने जनजागृती करून राबवलेल्या मोहिमेत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सुमारे दोन ट्रॉली प्लॅस्टिक संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यांत आली.
भुईंज ग्रामपंचायतीचे सरपंच विजय वेळे उपसरपंच शुभम पवार ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शेळके यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी,आशा सामाजिक कार्यकर्त्यां,अंगणवाडी सेविका,व सेवाभावी संस्था,निरंकारी मंडळ,यांनी सामुदायिक पणे सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी केली
भुईंज बसस्थानक उड्डाणपूल ते कृष्णा नदीच्या काठावर ही मोहीम पूर्ण करण्यात आली, संकलित केलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावून त्याचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शेळके यांनी यावेळी शपथ दिली आभार ग्रामपंचायत सदस्य अमित लोखंडे यांनी मानले,
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



