वाई कृषी मित्र अरुण आदलिंगे यांना साप्ताहिक कृष्णातीरचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

Ideal social worker award, weekly krushnateer, Arun adlinge, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

ग्रामीण पत्रकारितेचा दीपस्तंभ असणाऱ्या साप्ताहिक कृष्णातीर चा "आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार" वाई कृषी मित्र अरुण आदलिंगे यांना जाहीर झाला आहे. शनिवारी गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक ग्रंथालय, वाई येथे  वर्षा देशपांडे,  श्रीपाद जाधव,  सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. या अगोदर कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. जय हिंद फाउंडेशन फलटणचा "जय हिंद गौरव पुरस्कार" मीडिया एक्जीबिशन नाशिकचा "युवा युनिव्हेटिव्ह कृषी पुरस्कार" प्रगती प्रकाशन कोल्हापूरचा "कृषीभूषण" वाईतील साप्ताहिक जल्लोष चा "सन्मित्र पुरस्कार" जिल्हा ग्रंथालय संघ सातारचा महात्मा ज्योतिराव फुले "आदर्श ग्रंथ मित्र पुरस्कार" ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

शेती शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अरुण आदलिंगे गेली 32 वर्षे कार्यरत आहेत प्रभावी वक्तृत्व, संघटन आणि सकस सेवा. सकारात्मक कार्याच्या आवडीमुळे अल्प कालावधीत ते लोक मित्र बनलेत. 

साप्ताहिक कृष्णातीरचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !