नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण - नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

अवघ्या दोन महिन्यांत न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Nasarapur rape case, Accused sentenced to death, Maharashtra, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पुणे 

नसरापूर (ता. भोर) येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अमानुष लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे (वय ६५) याला पुण्यातील विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आज अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला. हा गुन्हा 'रेअरेस्ट ऑफ रेअर' (अति दुर्मिळातील दुर्मिळ) असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे प्रकरण?

गत १ मे रोजी नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. सर्व स्तरातून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास पूर्ण केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. न्यायाधीशांनी १३७ पानांचा सविस्तर निकाल तयार केला. सरकारी पक्षाने 'वसंत धुपारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य' आणि 'बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य' यांसारख्या सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या खटल्यांचे दाखले देत आरोपीसाठी फाशीची मागणी केली.

बचाव पक्षानेही युक्तिवाद केला, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. "जितका गंभीर गुन्हा, तितकी कठोर शिक्षा" हे तत्त्व अधोरेखित करत न्यायालयाने स्पष्ट केले की, हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानवीय आणि समाजमनाला हादरवणारा आहे. आरोपीच्या वयाचा किंवा इतर बाबींचा विचार केला तरी, या गुन्ह्यातील क्रौर्य पाहता त्याला कोणतीही सवलत देता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

राज्यातील सर्वात जलदगतीने झालेला निकाल

या प्रकरणातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी तपास, पुरावे आणि न्यायालयातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. अत्याचार आणि हत्या प्रकरणातील राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक खटला ठरला आहे.

न्यायालयाच्या या निकालामुळे पीडित कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजात जनजागृती आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. सरकारी वकील विपुल दुशिंग यांनी या प्रकरणात प्रभावी युक्तिवाद केला.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !