दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा कुटुंबीयांना दिला ठाम शब्द
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
मालुसरेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या अभिजित वाडकर यांच्या कुटुंबीयांची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नुकतीच भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा ठाम शब्द कुटुंबीयांना दिला.यावेळी मकरंद पाटील यांनी भविष्यात धरण पात्रातून कोणालाही अनधिकृतपणे माती उपसा करता येणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले. तसेच पश्चिम भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेत लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयांची आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली.
यावेळी आनंद चिरगुटे, पंकज वाडकर, मालतपूरचे उपसरपंच निलेश वाडकर, रामचंद्र विरकर तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री महोदयांनी कुटुंबीयांशी संवाद साधत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



