सातारा जिल्ह्यातील न्यायदान पॅटर्न अन्य जिल्ह्यांनी अनुसरला - न्यायमूर्ती राजेश पाटील

न्यायदान प्रक्रिया गतिमान व कालमर्यादित व्हावी.

Judgment pattern, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा जिल्ह्यातील न्यायदान पॅटर्न अन्य जिल्ह्यांनी अनुसरला आहे. पेपरलेस, ई फाइलिंग याद्वारे न्यायदान प्रक्रिया गतिमान व कालमर्यादित व्हावी, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी व्यक्त केली. 

येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ आज मुंबई उच्च न्यायालयातील

सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोंसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वाघमारे होते.

न्यायमूर्ती पाटील यांनी पर्यावरण संरक्षण संस्थेची मदत घेऊन न्यायालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही दिली.

न्यायमूर्ती श्री. भोसले म्हणाले, न्यायालयाच्या इमारतीचा पाया भरणीचा समारंभ हा एक ऐतिहासिक क्षण आहे.

सर्व पक्षकार आणि विधीज्ञ यांना न्यायदानाच्या पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या तर न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि कमी त्रासदायक होते. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य दिले आहे. नवीन इमारतीचे काम नियोजित वेळेत, गुणात्मक व दर्जेदार, पर्यावरण पूरक झाले पाहिजे. या परिसरात आताच झाडे लावली तर दोन वर्षात निसर्ग सौंदर्य वाढेल. त्यादृष्टीने नियोजन करावे.

यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अरविंद वाघमारे, वाईचे प्रथम जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. डी.बी.माने, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. वसंतराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, उपअभियंता स्वप्निल पाटील, महेश गोंजारी यांचा सत्कार करण्यात आला.

वाई वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.सुनील वाडकर यांनी प्रास्ताविक केले. पदाधिकारी ॲड जयंत गायकवाड, ॲड. संजय खडसरे, ॲड. रविंद्र भोसले, ॲड.महेश शिंदे, ॲड.प्रशांत खरे, ॲड.सुमित सणस, ॲड. इनायत मणेर,ॲड. अतुल गाढवे - पाटील, ॲड.आय.डी.खान, ॲड.अजित शेळके, ॲड.गौरव खोपडे (खंडाळा), ॲड. संजय दस्तुरे, ॲड.संतोष चोरगे (महाबळेश्वर ) यांनी मान्यवरांचे स्वागत केले. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश ए. ए. पाचर्णे यांनी आभार मानले. सातारा जिल्हा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती भाटिया यांनी सूत्रसंचालन व प्रमुख पाहुणेचा परीचय करून दिला.केले. कार्यक्रमास मुख्य न्यायदंडाधिकारी सातारा श्रीमती व्हि. एम कराडकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.जी काटकर, श्रीमती डी.एस. शिंगणे, दुसरे दिवाणी न्यायाधीश आर. एम. भेंडे, जिल्हा सरकारी वकील व त्यांचे सर्व सहकारी, पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी तसेच वाई, खंडाळा, महाबळेश्वर वकील संघटनेचे पदाधिकारी,पक्षकार व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीच्या जागेतील लहान मोठे १९ झाडांचे वाई- पाचवड रस्त्यावर पुर्नरोपण करण्यात आले असून ती झाडे सुस्थितीत असलेने उपस्थितांनी कौतुक केल.

वाई येथे १४ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा सत्र व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याची स्थापना करण्यात आली. नूतन इमारतीसाठी वित्त विभागाने ३४ कोटी ४३ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असून 

त्यामध्ये एकूण सहा मजले आहेत. तळमजल्यावर वाहनतळ,पहिल्या मजल्यावर महिला व पुरुष विधीज्ञ यांच्यासाठी बाररूम, सुसज्ज ग्रंथालय, लॉकअप रूम, दुसऱ्या मजल्यावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांची कार्यालये, तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर प्रत्येकी दोन न्यायालये, पाचव्या मजल्यावर एक न्यायदान कक्ष, लोकअदालत कक्ष, त्या अनुषंगिक कार्यालये, सहाव्या मजल्यावर न्यायिक अधिकारी यांच्यासाठी ग्रंथालय व कॉन्फरन्स हॉल, या इमारतीमध्ये चार जिने व लिफ्ट, विधीज्ञ व पक्षकार, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी स्वतंत्र

वेटींग रूम व स्वच्छतागृह, पोस्ट ऑफिस, बँक, एटीएम केंद्र, हिरकणी कक्ष, दवाखाना, रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टिम अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. येथील पूर्वीच्या २० ते २२ वृक्षांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने ' वाई - पाचवड' रस्त्यावर यशस्वी पुनर्रोपण केले आहे. पेपरलेस न्यायदान हे उदिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात असून त्याद्वारे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल, गरीब व पीडित पक्षकारांना वेळेत न्याय मिळावा आणि प्रलंबित खटले लवकर निकाली काढण्याचा संकल्प आपण करु या, असे वाईचे जिल्हा सत्र प्रथम न्यायाधीश डी.बी.माने यांनी सांगितले.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !