विद्यालयाच्या वतीने स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, छ.संभाजीनगर ( विभागीय उपसंपादक मनोज चव्हाण)विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन शितोळे यांचा सत्कार केला व नवीन जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या शैक्षणिक अनुभवाचा व नेतृत्वगुणांचा विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आपल्या मनोगतात किरण शितोळे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शिक्षक व पालकांच्या सहकार्याने संस्थेच्या उज्ज्वल परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
समारंभ प्रसंगी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत विद्यालयाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



