संकल्प न्यूजचे संपादक अशोक इथापे यांना महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती

विश्वासार्ह पत्रकारितेची शासनाकडून दखल

Government of Maharashtra Accreditation, ashok ethape, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई येथील  ‘संकल्प न्यूज’ साप्ताहिकाचे संपादक तसेच संकल्प न्यूज पोर्टल आणि संकल्प मीडिया समूहाचे प्रमुख अशोक इथापे यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अधिस्वीकृती (Accreditation) प्रदान करण्यात आली आहे. पुणे विभाग पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सातारा जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष हरीश पाटणे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे तसेच दैनिक पुढारीचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण यांच्या हस्ते अशोक इथापे यांना अधिस्वीकृती कार्ड प्रदान करण्यात आले. अशोक इथापे हे गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी ‘संकल्प न्यूज’ साप्ताहिकाच्या माध्यमातून वाचनीयता, विविधता आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीवर आधारित पत्रकारिता जोपासली आहे. महिला, युवक, विद्यार्थी तसेच समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त सदरे आणि सकारात्मक, समाजाभिमुख बातम्या प्रसिद्ध करण्यामध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे.आधुनिक पत्रकारितेच्या प्रवाहाशी सुसंगत राहून त्यांनी संकल्प न्यूज पोर्टल तसेच संकल्प न्यूज मराठी युट्यूब चॅनलची स्थापना करून डिजिटल माध्यमांमध्येही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलीआहे.पत्रकारितेसोबतच ज्ञानसंकल्प अबॅकस अँड ब्रेन डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर, Dmit करिअर कौन्सिलिंग सेंटर तसेच संकल्प संगीत साधना केंद्र यांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व कला क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध सण, उत्सव, यात्रा-जत्रा, पर्यावरण, ग्रामविकास, शिक्षण, करिअर आणि सामाजिक विषयांवरील माहितीपट व विशेषांक प्रकाशित करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.पद्मश्री शाहीर साबळे यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त त्यांनी संपादित केलेली ‘कलास्पर्श’ स्मरणिका पसरणी येथे झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली होती. या कार्याचा गौरव करत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी अशोक इथापे यांच्या पत्रकारिता व समाजसेवेतील योगदानाचे विशेष कौतुक केले. तसेच ‘संकल्प न्यूज’ने भविष्यात आणखी उंच भरारी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनीही नियमित अंक प्रसिद्धी, समतोल वृत्तांकन आणि सातत्यपूर्ण पत्रकारितेमुळेच ही अधिस्वीकृती प्रदान करण्यात आल्याचे नमूद केले.या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, भुईंज प्रेस क्लब, सर्व पदाधिकारी नगराध्यक्ष अनिल सावंत, पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अशोक इथापे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !