एआय तंत्रज्ञानाचा बी फार्मसी अभ्यासक्रमात समावेश - प्राध्यापकांनी एआय AI टूल वापरणे आवश्यक

शैक्षणिक वर्ष सन २०२६ -२७ पासून लागू 

AI Technology B Pharmacy, shrirang katekar, maharashtra, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

जागतिक आरोग्य क्षेत्रातील बदलत्या आव्हानाला सामोरे जाताना औषधनिर्माण क्षेत्रात दर्जात्मक व कौशल्य विकसित मनुष्यबळ निर्माण करणे ही प्रमुख उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून भारतीय फार्मसी कौन्सिलने (पी.सी.आय.),नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एन.ई.पी.) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शैक्षणिक वर्ष सन २०२६ -२७ पासून प्रथम वर्ष बी.फार्मसी(पदवी) अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आणि मशीन लर्निंग(एम.एल.) या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमात नव्याने समावेश केला आहे. मानवी आरोग्याशी निगडित असणाऱ्या या अभ्यासक्रमात नव्याने करण्यात आलेले बदल विद्यार्थ्यांच्या दर्जात्मक व गुणात्मक प्रगतीला पूरक ठरणार आहेत.औषधनिर्माण क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक सक्षम व कौशल्य विकसित घडवण्याचे उद्दिष्ट या नव्या शैक्षणिक धोरणात सामविलेले आहे.यापूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पारंपारिक शिक्षण पद्धतीत आता बदल करत आधुनिक शिक्षणाची कवाडे विद्यार्थ्यांना खुली करून देण्यात आली आहेत.जागतिक विद्यापीठांच्या स्पर्धेला सामोरे जाताना भारतीय विद्यार्थ्यांमध्ये ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण मिळाले पाहिजे ही प्रमुख भूमिका भारतीय फार्मसी कौन्सिलने ठेवून हा बदल केलेला आहे.या बदलामुळे भारतीय औषधनिर्माण शास्त्र अधिक प्रगल्भ होणार आहे.मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या विविध आजारांवर प्रभावी व परिणामकारक औषध निर्मितीसाठी भविष्यकाळात कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आधारित मनुष्यबळ उपयुक्त ठरणार आहे.विशेषता नाविन्यपूर्ण संशोधनासाठी व रुग्णसेवेला अधिक सेवा देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा बी.फार्मसी (पदवी) अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे या अभ्यासक्रमाच्या दर्जात्मक व गुणात्मकतेला आता चालना मिळणार आहे.नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आता प्राध्यापकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही या पुढील काळात करावा लागणार आहे.यासाठी प्राध्यापकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे सखोल ज्ञान घेणे आता आवश्यक राहणार आहे.नव्याने अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) व मशिन लर्निग (एम.एल.) तंत्रज्ञानाचे या क्षेत्राला अधिक लाभ होणार आहेत.विशेषता डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान,लसीकरण,टेली फार्मसी सेवा, पॉईंट ऑफ केअर टेस्टिंग,ऑटोमेशन,फर्माकोजेनोमिक्स आणि स्पेशलिटी फार्मसी सेवेचा विस्तार होण्यास या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे.त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने औषधांचे दुष्परिणाम आणि औषधातील अंतरक्रिया सहजपणे ओळखता येणार आहेत. औषधांमधील मात्रा (डोस) अनूकलित करण्यासाठी व औषध उपचार पुरवण्यासाठी ए.आय. तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.अभ्यासक्रमात नव्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश झाल्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ही वाढणार आहे.अर्थात विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून भारतीय फार्मसी कौन्सिल,नवी दिल्ली यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील कुशल व कौशल्य विकसित मनुष्यबळाचे उद्दिष्टे ठेवूनच बी. फार्मसी (पदवी) अभ्यासक्रमात नव्याने हा बदल केलेला आहे.

औषधनिर्माण क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी भारतीय फार्मसी कौन्सिल नवी दिल्लीने अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेचा केलेला समावेश स्तुत्य आहे.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा बदल उपयुक्त ठरणार आहे.ए.आय.तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रात होणारा वापर पाहता या ज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना घेणे पुरक ठरणार आहे.त्याचबरोबर बी.फार्मसी अभ्यासक्रमात झालेल्या बदलामुळे नाविन्यपूर्ण संशोधनाला अधिक वाव मिळणार आहे.

श्रीरंग काटेकर,सातारा

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !