वाईच्या गणपती घाट परिसरातील अत्याचार प्रकरणात आरोपीविरुद्ध 48 तासांत दोषारोपपत्र दाखल

वाई पोलिसांची जलद कारवाई

Charge sheet filed against the accused, ganpati Ghat case, police, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

मंगळवार दि. 02 जून 2026 रोजी रात्री 12.10 वाजण्याच्या सुमारास वाई येथील गणपती घाट परिसरात 9 ते 10 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा  नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हा भा.दं.वि. कलम 74 सह बालकांवरील लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) कलम 8 व 12 अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे अंमलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी  सुनील साळुंखे यांनी केला. तपासादरम्यान आवश्यक पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध भक्कम प्रकरण तयार करण्यात आले.

पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास पूर्ण करत अवघ्या 48 तासांच्या आत मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, सातारा निखिल पिंगळे  व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडुकर,  यांच्या मार्गदर्शनाखाली   उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग वाई सुनील साळुंखे ,  जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे ,  सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी ,  महिला पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट , पो.हवा. सुनिल भिंगारे, पो. कॉ. रुपेश जाधव, निलेश देशमुख, होमगार्ड नितीन मोहिते यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.

या कारवाई बाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी वाई पोलिसांच्या या तत्पर व प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !