वाईत वन्यप्राणी घोरपडीच्या अवयवांची तस्करी विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक

न्यायालयाने सुनावली ३ दिवसांची वनकोठडी

Wildlife Trafficking, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वन्य प्राणी घोरपडीच्या अवयवांची अवैद्य विक्री व तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

ही कारवाई दि. 23 मे रोजी वन्यप्राणी घोरपड च्या अवयवांची तस्करी करून अवैध विक्री करणार असल्याबाबतची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा अतिरिक्त कार्यभार वाई (प्रा) यांना मिळाल्याने वाई वनपरिक्षेत्रातील कर्मचारी तसेच फिरते पथक सातारा कडील कर्मचारी यांना सोबत घेऊन सापळा रचला. संध्याकाळी ६:१५  वाजता आरोपी  १) महेश सूर्यकांत व्होनफडे वय २६ वर्षे, रा. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर व आरोपी  २) रोहन गजानन कदम वय २३ वर्षे, रा. तांबवे भवानीनगर, पो. माळीनगर अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर यांना मारुती सुझुकी कंपनीची वॅगनआर वाहन क्र. MH-14 HW-0506 ची मौजे कोचळेवाडी ता. वाई गावाचे हद्दीतील वाई ते मांढरदेव रस्त्यावरील हॉटेल विक्रांतच्या आवारात सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता.

त्यामध्ये घोरपड या वन्यप्राण्याचे मानेपासून तोंडापर्यंतचा अवयव १, नर घोरपडीचे लिंग - ४ (हत्ताजोडी), वाघ / बिबट वन्यप्राणी सदृश्य प्राण्याचे नख १, इंद्रजाल १ (समुद्री वन्यजीव) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपींच्या अंगझडतीमध्ये आरोपींकडून रोख रक्कम १५,०००/- व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल २ जप्त करण्यात आले. तसेच आरोपींनी वन्यप्राणी अवयव वाहतूक व तस्करीसाठी वापरलेले वाहन जप्त करून त्याना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ कायद्याच्या अन्वये वनपाल वाई यांचेकडील  अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी क्र. १ व २ यांना दिनांक २४ मे रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांचे समोर हजर केले असता मा. न्यायालयाने सदर दोन्ही आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी वाई करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. उपवनसंरक्षक सातारा  अमोल सातपुते (भा.व.से), मा. विभागीय वनाधिकारी (दक्षता) कोल्हापूर  संजय वाघमोडे, मा. सहायक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा  प्रदीप रौंधळ, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) वाई,  गणेश महांगडे, वनपाल वाई, संग्राम मोरे, वनपाल फिरते पथक  धोंडीबा बोडके तसेच वाई वनपरिक्षेत्रातील व फिरते पथकाचे अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडली. सदरच्या कारवाई मध्ये मानद वन्यजीव रक्षक  रोहन भाटे यांनी मोलाची मदत केली.

वनविभागाने केले नागरिकांना आवाहन

अवैध वन्यप्राण्यांची शिकार करणे, त्यांची तस्करी करणे, वन्यप्राण्यांची व त्यांच्या अवयवांची अवैधरीत्या विक्री / खरेदी करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ या कायद्यान्वये अपराध आहे. सदरच्या अपराधास ३ ते ७ वर्षापर्यंतचा कारावास व २५,००० पेक्षा कमी नसेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रद्धेपोटी किंवा जादूटोणा नावाखाली वन्यप्राण्यांची शिकार, अथवा त्यांच्या अवयवांची तस्करी तसेच वाहतूक विक्री करू नये. तसेच नागरिकांनी आपल्या जवळपास अशा प्रकारची घटना वनगुन्हा घडत असल्यासची माहिती वनविभागास द्यावी असे आवाहन सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक  अमोल सातपुते (भा.व.से.) यांनी केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !