राज्याचे शिक्षण मंत्री ना.पंकज भोईर यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
"दक्षिण काशी" वाई अशी अध्यात्मिक ओळख असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरावर गेले पाच दिवस लघु कुंभ मेळ्याचे आयोजन अतिशय शिस्तबध्द पद्धतीने करण्यात आले होते. यामध्ये कुंभ मेळ्याचे आकर्षण ठरली ती कृष्णा माईची दररोज होणारी महाआरती. लाखो भाविकांनी सायंकाळी सात वाजता गणपती घाटावर प्रचंड गर्दी करून आरतीचा आनंद लुटला. अनेक दिग्गजांनी या कुंभ मेळ्यास हजेरी लावून आपला या कार्यास पाठिंबा असल्याचे नमूद केले. विविध प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेवून राजकीय लोकांनी सुध्दा लघुकुंभ मेळ्याचा आनंद घेतला. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शिक्षण मंत्री ना. पंकज भोईर, विविध संघटनाचे पदाधिकारी, जैन समाज, यांनी उपस्थिती दर्शविल्याने या मेळा प्रचंड प्रमाणात यशस्वी ठरला. वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी आखलेला लघुकुंभ मेळा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. त्याला वाईकर नागरिकांनी सुध्दा पाठिंबा देवून हा मेळा यशस्वी करून दाखवला आहे पाच दिवस चाललेल्या . संपूर्ण देशातील नागा स्वामींसह, अनेक राज्यातील साधुनी उपस्थिती लावून वाईची भूमी अगोदर पवित्रच होती परंतु यांच्या सर्वांच्या चरणास्पर्शाने पवित्र केली.
पाच दिवस चाललेल्या लघुकुंभ मेळ्याची सांगता वाई शहरातून निघालेल्या भव्य मिरवणूक व शाही स्नानाने व सायंकाळी सात वाजता होत असलेल्या भव्य महाआरतीने करण्यात आली. सोमवारी सकाळी दहा वाजता महागणपतीची आरती करून साधून रथात, घोड्यावर, बसवून संपूर्ण शहरातून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. वाई गणपती घाटावरून मिरवणुकीस सुरुवात होवून गंगापुरी पुरीतील शाहीर चौकातून नगरपालिका, भाजी मंडई, जैन मंदिरावरून दातार दवाखान्या वरून किसनवीर चौकातून पोलीस स्टेशनहून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुन्हा गणपती घाटावर सांगता करण्यात येवून शाही स्नानाला सुरुवात करण्यात आली. धोम पाटबंधारे खात्याने कृष्णा नदीत पाणी न सोडल्याने सर्वच साधुनी शाही स्नानात सहभाग घेतला नाही. प्रशासन किती निर्डावाले असल्याचे प्रामुख्याने जाणवले. पाण्याला दुर्गंधयुक्त वास येत असल्याने कृष्णा नदीत साधुनी उतरण्याचे धाडस केले नाही.
वाई तालुक्यात अनेक वेळा कालव्याला भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यावेळी यांचे नियम कुठे जातात. सर्वसामान्य नागरिकांचा कार्यक्रम म्हटले कि, प्रशासनाचे नियम आडवे येतात. त्यानंतर सायंकाळी सात वाजता सर्व वाईकरांनी हातात आरतीचे ताट घेवून महाआरती करण्यात आली. पाच दिवस चाललेल्या लघुकुंभ मेळ्याचे सांगता करण्यात आली. यावेळी अनेक दानशूर संस्थांनी व व्यक्तींनी सांधुंच्या नाष्ठ्याची व प्रसादाची सोय करून लाभ घेतला. गेल्या पाच दिवसात पाच ते सहा लाख भाविकांनी सांधू संतांचे दर्शन घेतले. हा कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत, काशिनाथ शेलार, सचिन घाटगे, दीपक ननावरे, प्रदीप जायगुडे , गुजरातहून आलेले योगेन्द्र्गिरी महाराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, घनशाम चक्के, विरोधी पक्ष नेते विजय ढेकाणे, मंदीर महासंघ तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, ॲड. दीप्ती पिसाळ, सौ.सरिता सावंत, जितेंद्र पिसाळ, सचिन सावंत, निलेश मोरे, अजीत घोडके, गजानन भोसले, सुशांत गोळे, सचिन मानकुंबरे ,संदीप घोरपडे, राजेश गुरव, संगीता गुरव, प्रसाद चारेगांवकर, प्रवीण जाधव, यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, स्वयंसेवक, भाविक आणि वाईकर नागरिक यांनी विशेष परिश्रम घेतले.
गेले पाच दिवस दिव्यांच्या प्रकाशाने आणि भक्तीच्या चैतन्याने कृष्णाकाठ उजळून निघाला होता. पावित्र्य कृष्णामाई महाआरतीचे दृश्य अतिशय विलोभनीय वाटत होते. काशीच्या गंगेच्या काठी आल्याचा भास होत होता. या सोहळ्याचे औचित्य साधून वाई शहरासह संपूर्ण तालुक्यातून भाविकांचा जनसागर कृष्णाकाठावर लोटला होता. महाआरती संपन्न झाल्यानंतर, कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या उपस्थित महंत, साधू, संत आणि नागा सन्यासी यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन, लघुकुंभमेळा सेवा समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत चोख नियोजन व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता हा सोहळा अत्यंत शिस्तीत आणि उत्साहात पार पडला
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



