महाराष्ट्र दिनाचे औचित्याने कृषी व जन विकास प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी फैजल पठाण)
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पारनेर येथे 'कृषी व जन विकास प्रतिष्ठान'च्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ व्यक्तींना 'पारनेर भूषण पुरस्कार (वर्ष दुसरे)' देऊन सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दिमाखदार सोहळ्यात १० पुरुष आणि ८ महिलांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण गुरुवर्य डॉ. नारायण महाराज जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील आय.ए.एस. अधिकारी भाई कमला आनंद आणि पारनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. विद्याताई कावरे उपस्थित होत्या. या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महिला सक्षमीकरणाचा गौरव
या सोहळ्यात पळवे बुद्रुक येथील मंगल मोहन पळसकर यांना 'उत्कृष्ट महिला सक्षमीकरण' क्षेत्रातील कार्यासाठी 'पारनेर भूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. उमेद अभियान (पंचायत समिती, पारनेर) अंतर्गत सी.आर.पी (CRP) म्हणून त्यांनी केलेले काम आदर्शवत ठरले आहे. यावेळी 'आदिनाथ महिला ग्रामसंघा'चे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला मोहन पळसकर सर, कु. दर्शन, हारूबाई पळसकर, अलका मोढवे, विठ्ठल मोढवे, विजय पवार, मुख्याध्यापक वैद्य सर, मेजर भाऊसाहेब तरटे, सुलभा तरटे, विद्या जाधव, विजया जाधव, मीना जाधव, उर्मिला कळमकर, शीलाताई कळमकर, साजिया तांबोळी, माधुरी पळसकर, रतनबाई पळसकर, ऑडिटर मीराताई दिवटे, प्रशांत ढुस यांसह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि पुरस्कारार्थींचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या हातांना बळ मिळावे आणि इतरांना त्यातून प्रेरणा मिळावी, याच उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे."- अरुण आंधळे पाटील(अध्यक्ष, कृषी व जन विकास प्रतिष्ठान)
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



