पार्थ नेवगे, हर्षवर्धन वाघ आणि अल्फाज कुरेशी आपापल्या शाखेतून प्रथम
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत 'श्री गणेश शिक्षण संस्था' संचलित श्री गणेश कनिष्ठ महाविद्यालय, देवगाव रंगारी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.
शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे
विज्ञान शाखेतून पार्थ राजेंद्र नेवगे याने ८१.००% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. सौम्या ललितकुमार पापडीवाल (७८.५०%) हिने द्वितीय, तर श्रेया नितीनकुमार पापडीवाल (७७.५०%) हिने तृतीय क्रमांक मिळवला.
वाणिज्य शाखेत हर्षवर्धन जालिंदर वाघ याने ७९.३३% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. ऋतुजा संजय क्षीरसागर (७६.८३%) आणि निकिता भारत सोनावणे (७४.५०%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
कला शाखेतून अल्फाज अयाज कुरेशी याने ७५.५०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. अमरसिंग शक्तीसिंग घुनावत (७१.००%) द्वितीय आणि सुमय्या निसार बेग (७०.८३%) हिने तृतीय क्रमांक पटकावला.या यशाचे खरे गमक म्हणजे महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबवलेली शिस्तबद्ध अभ्यासाची पद्धत, डिजिटल अध्यापन आणि शिक्षकांनी घेतलेले विशेष परिश्रम यामुळेच हे यश शक्य झाले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश भांडवलदार, सचिव एल. डी. भांडवलदार, शालेय समितीचे अध्यक्ष सुभाषराव भांडवलदार, प्राचार्य आर. एस. पांडे, उपप्राचार्य तसेच सर्व शिक्षक बांधवांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून महाविद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




