वाई तालुक्यातील दोन देवस्थानांच्या विकासाला गती - ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जासाठी प्रस्ताव

‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास पर्यटन विकासाला मिळणार मोठी चालना  

Important step for the development of places of worship, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )

मंत्रालय स्तरावर आज वाई तालुक्यातील मांढरदेव काळूबाई देवस्थान आणि धोमचे नरसिंह सिद्धेश्वर देवस्थान या दोन महत्त्वाच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. या देवस्थानांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी प्रस्तावाद्वारे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आली.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर परिसरातील युवा नेते विराज शिंदे तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांनी ही मागणी पुढे मांडली. कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तेथील धार्मिक व सांस्कृतिक केंद्रे सक्षम असणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास या परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांची सुरक्षा तसेच पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. याचा सकारात्मक परिणाम स्थानिक व्यावसायिकांवरही होणार असल्याचे सांगण्यात आले.

या मागणीची दखल घेत मंत्री जयकुमार गोरे यांनी तत्वत: मान्यता देत ग्रामविकास प्रधान सचिवांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाकडून मिळालेला हा ‘हिरवा कंदील’ परिसराच्या विकासासाठी आशादायी मानला जात आहे. श्रद्धेची ही ठिकाणे अधिक शुभेच्छा व सुरक्षित होणे हे आपल्या सर्वांचे सामुहिक कर्तव्य आहे भविष्यात विकास कामांचा दर्जा टिकून ठेवणे आणि आपल्या वारशाचे जतन करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी असेल नियोजनाची योग्य दिशा व प्रशासकीय पाठपुराव्यामुळे आपल्या भागाचा कायापालट करू शकतो.

दरम्यान, मांढरदेव पठारावरील ग्रामस्थ विजय मांढरे, जगन्नाथ मांढरे, एकनाथ मांढरे, अमित मांढरे, संतोष मांढरे, कार्तिक मांढरे यांच्यासह अन्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

या निर्णयामुळे वाई तालुक्यातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगाराना व्यवसाययाची संधी उपलब्ध होणार आहे व धार्मिक पर्यटनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !