वृक्षद्रोह्यांचे कृत्य - निसर्गप्रेमी नाराज
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्षसंवर्धन मोहिमेसाठी अखंडपणे प्रयत्न करीत आहे.तर काही विघ्नसंतोषी मंडळी वृक्षांना आगी लावून ते नष्ट करीत आहेत.यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे.सातारा - पुणे जुन्या हायवे मार्गावरील वर्ये गावच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे महाकाय वटवृक्षाला विघ्न संतोषी मंडळींनी आग लावून ते नष्ट केले आहे.रस्त्याच्या कडेला बहरलेल्या या वटवृक्षाने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना मायेची सावली दिली होती.सध्या वृक्षांना आगी लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून ते मानवी जीवनासाठी भविष्यात घातक ठरणार आहेत.वृक्ष लावा, वृक्ष जगवा ही शासनाची भूमिका असताना विघ्न संतोषी मंडळी त्याला गालबोट लावत आहे. वर्येमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे वृक्षप्रेमींमध्ये संतापची लाट उसळलेली आहे.संबंधित यंत्रणांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.वृक्षांना आग लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
जीवसृष्टीत वृक्षांचे महत्त्व अनमोल आहे.वृक्षांना आगी लावणे हे असंस्कृतपणाचे लक्षणे आहेत.मानवी जीवनासाठी ऑक्सिजन पुरवणाऱ्या वटवृक्षाचे रक्षण करणे ही खरे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.वर्ये परिसरात वटवृक्षाला लावण्यात आलेली आग याचा निषेधच केला पाहिजे.
श्रीरंग काटेकर,
वृक्षप्रेमी, सातारा
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




