पंढरपूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा - आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल - परिवहन विभागाला दिले कार्यवाही करण्याचे निर्देश

RTO office sanction, MLA samadhan autade, CM devendra Fadnavis, minister pratap sarnaik, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने, फिटनेस तपासणी व इतर परिवहन विषयक कामासाठी सोलापूरला जावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ व आर्थिक अडचणीशी सामना करावा लागत नागरिकांच्या सोयीसाठी पंढरपुर  येथे नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीची दखल घेऊन पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पंढरपूर येथे नवीन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात यावे. अशी आग्रही मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने संबंधित विभागांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच पंढरपुरात नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्याचा मार्ग आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यामुळे मोकळा झाला आहे. 

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. लाखो वारक-यांचे श्रध्दास्थान व उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर हे चैत्री, आषाढी, कार्तीकी, माघी यात्रे साठी मर्यादीत न रहाता या तिथक्षेत्रात कर्नाटक, आध्रप्रदेश, तामीळनाडू या राज्यातून व देशभरातून वर्षभरात एक कोटी पेक्षा अधिक भाविक पंढरपूर येथे दाखल होत असतात.

पंढरपूर शेजारील मंगळवेढा-सांगोला-मोहोळ-माढा तसेच पंढरपूर शेजारील कासेगांव, लक्ष्मीटाकळी, वाखरी, गोपाळपूर ही निमशहरी म्हणून गावे वसलेली आहेत.

पंढरपूर शहर व ४ निमशहरी गावाच्या लोकसंख्या २ लाखाचे आसपास असल्याने येथे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून वाहन नोंदणी, परवाना, तपासणी व इतर परिवहन विषयक कामांसाठी नागरिकांना दूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागते. नागरिकांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आमदार समाधान आवताडे यांनी करून यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.

त्या अनुषंगाने शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून शासन पत्र क्र. एमव्हीडी ०४२६/प्र.क्र.१२८/परि-४ नुसार, पंढरपूर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक बाबींचा अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने पंढरपूर येथे नवीन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्याचा मार्ग आमदार अवताडे यांच्या पाठपुराव्यामुळे मोकळा  झाला आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !