स्वेरीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती साजरी

छत्रपती संभाजी महाराजांच्या धाडसी कामगिरीवर प्रकाश

Chhatrapati Sambhaji Maharaj jayanti, sveri, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती साजरी करण्यात आली. 

प्रारंभी अक्षरमित्र अमित बोरखडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी साहित्यिक प्रशांत वाघमारे म्हणाले की, ‘छत्रपती संभाजी राजे हे सुसंस्कृत, पराक्रमी होते. त्यांनी कमी वयात सुद्धा वेगवेगळ्या भाषा अवगत केल्या. ते एक वीर म्हणून जगले. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ एवढी घोषणा जरी कानी पडले तर मन प्रफुल्लीत होऊन जाते.’ असे सांगून त्यांनी ‘छत्रपती’ या आदरार्थी शब्दाचा सविस्तर अर्थ स्पष्ट केला. अक्षरमित्र अमित बोरखडे म्हणाले की, ‘छत्रपती संभाजी राजांचे कार्य पाहता ते शेवटपर्यंत पराक्रमी राजे राहिले. शत्रू पुढे ते कधीही डगमगले नाहीत. त्यांनी कमी कालावधीत आपल्या अफाट ताकतीच्या जोरावर स्वराज्याचे रक्षण केले.’ असे सांगून छत्रपती संभाजी महाराजांच्या धाडसी कामगिरीवर प्रकाश टाकला. यावेळी मधुकर पकाले, स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख प्रा. प्रवीण मोरे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. डॉ.नीता तळवलकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !