स्वेरीचे डॉ. आदित्यकुमार अंशु हे उत्कृष्ठ संशोधक पुरस्कार २०२६ ने सन्मानित

स्वेरीच्या प्राध्यापकाचा ईशान्येत डंका

Professor Anshu got best scientist award, Itanagar, Arunachal Pradesh, Maharashtra, sveri, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये सिव्हील इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेल्या डॉ.आदित्यकुमार अंशु यांना मानाचा ‘बेस्ट रिसर्चर अवार्ड २०२६’ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), पंढरपूरचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या प्रेरणेने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. आदित्यकुमार अंशु यांनी हे यश संपादन केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

इटानगर (अरुणाचल प्रदेश) ईशान्य प्रादेशिक विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (एनईआरआयएसटी) येथे आयोजिलेल्या स्टीम रिसर्च सोसायटीच्या सहाव्या सत्कार समारंभामध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले. स्वेरीच्या डॉ. अंशु यांना हा पुरस्कार शोध, नवीन विचार आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल दिला गेला आहे. या कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून आलेले अनेक प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक उपस्थित होते. या समारंभात डॉ. अंशू यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मशीन इंटेलीजन्स फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन्स (एमएआयटीआरआय -२०२६) या सहाव्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये या समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी परिषदेच्या सर्वसाधारण अध्यक्षा प्रा. डॉ.जॉयत्री बोरा हजारीका यांच्या हस्ते डॉ.अंशू यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी स्प्रिंजरचे कार्यकारी संपादक डॉ.अनिंदा बोस, एसटीईएम रिसर्च सोसायटीचे संस्थापक डॉ.तरूण के. शर्मा यांच्यासह तेथील अधिकारी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्धल डॉ.अंशु यांचे संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, इतर विश्वस्त व पदाधिकारी, तसेच संस्थेअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सतिश मांडवे, लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. बनकर, इंजिनिअरींगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे स्वेरीच्या संशोधन विभागातील संशोधकांचा उत्साह आणखी वाढला आहे, हे मात्र नक्की.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !