केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार जाहीर

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

Abasaheb Veer Samajik Award Ceremony, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना लि. भुईंज यांच्या वतीने कारखान्याचे संस्थापक देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त “आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार” प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षीचा पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे. साखर उद्योगाचे स्थैर्य, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि पर्यायी, स्वच्छ इंधनाच्या प्रसारासाठी दूरदृष्टीने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला जाणार आहे.

या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. 9 मे रोजी किसनवीर कारखाना भुईज या ठिकाणी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.

 माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री  मकरंद  पाटील, खासदार उदयनराजे भोसले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (श. प.)शशिकांत शिंदे  उपस्थित राहणार आहेत.

 या कार्यक्रमास शेतगकरी, सभासद व नागरिकांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खा. नितीन पाटील यांनी केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !