रोबोटिक सर्जरी ठरतेय रुग्णांसाठी नवसंजीवनी - वैद्यकीय क्षेत्रात होतेय नवक्रांती

नामांकित हॉस्पिटलमध्येही नवे पर्व होणार सुरू

A revolution is taking place in the medical field, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने वैद्यकीय क्षेत्रात घडणारे बदल हे थक्क करणारे ठरत आहेत. पारंपरिक पद्धतीने यापूर्वी होत असलेली मानवी शरीरावरील शस्त्रक्रिया आता कालबाह्य होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात घडत असलेल्या या नवक्रांतीमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित होणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने होणारी शस्त्रक्रिया ही अचूक व परिणामकारक ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक कठीण व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानाच्या आधारे यशस्वी झाल्या आहेत. विशेषता दुर्धर आजार यामध्ये कॅन्सर लिव्हर व मेंदू मधील होणाऱ्या गाठी अगदी अलगदपणे रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून सहजपणे आता काढता येणे शक्य झाले आहे. मानवी शरीरातील दुर्धर आजार हा जेव्हा औषध उपचाराला साथ देत नाही त्यावेळी शस्त्रक्रिया शिवाय डॉक्टरांपुढे पर्याय उरत नाही. परिणामी शरीरात निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अनेकदा रुग्णांसाठी जीवघेणे ठरतात. काळाच्या ओघात आता वैद्यकीय सेवा क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याने शरीरातील कोणतीही अवयवांमधील शस्त्रक्रिया सहजपणे करता येणे शक्य झाले आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय क्षेत्र हे आता हायटेक बनले आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शस्त्रक्रिया करण्याकडे रुग्ण व डॉक्टरांचा कल वाढला आहे. अचूकपणे शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्त ठरत आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना वेदना कमी तसेच होणारे रक्तस्त्रो कमी होत असल्याने रोबोटिक शस्त्रक्रियेला रुग्णांची अधिक पसंती मिळत आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया दरम्यान संसर्गाचा धोका हा कमी जाणवतो. तसेच रुग्णालयात कमी कालावधीचा मुक्काम पैशाची बचत हे रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे आहेत. रोबोटिक शस्त्रक्रिया नव्याने आधुनिकीकरण होत असल्याने यापुढील काळातही रुग्णांना अधिक जलद गतीने सेवा देणे शक्य होणार आहे. असे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे. रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रियेची मागणी आता सर्वच स्तरावर जोर धरू लागली आहे शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील रुग्न रोबोटिक शस्त्रक्रियेला प्राधान्य देत आहे. सातारा शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये या तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रिया करण्याचा कल वाढत असून अनेक हॉस्पिटल ने याबाबत सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महाराष्ट्रासह पुणे कोल्हापूर येथे रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील याच पद्धतीने वाटचाल सुरू आहे. यामध्ये लिपरोस्कोपी द्वारे होणारी शस्त्रक्रिया सातारा जिल्ह्यातील अनेक नामवंत हॉस्पिटलमध्ये केली जाते. हा रोबोटिक शस्त्रक्रिये पूर्वीचा पहिला टप्पा मानला जातो. रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रियेचे नवे पर्व आता सुरू झाल्याने अनेक जटिल व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आहे आता सुलभ पद्धतीने यशस्वी करता येणे शक्य झाले आहे. 

मानवी जीवनाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे विविध आजार पाहता अनेक आजारावर शस्त्रक्रिया शिवाय पर्याय नसतो अशावेळी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विकसित झालेली रोबोटिक शस्त्रक्रियेकडे रुग्णांचा कल वाढला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन तज्ञ डॉक्टरांच्या साह्याने होणारी ही शस्त्रक्रिया अचूकपणे व रुग्णांना कमी वेदना देणारे ठरत असल्याने रुग्णांमधील भीतीचे प्रमाण कमी झाले आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया ही अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात केली जाते कमीत कमी छेद देऊन अधिक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सहजपणे डॉक्टरांना पार पाडता येते. भारतातही या तंत्रज्ञानाचा आधारे यशस्वीपणे शस्त्रक्रिया होत असल्याने नजीकच्या काळात रोबोटिक शस्त्रक्रिया ही रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे डॉ टी‌.बी. युवराजा यांनी नुकतेच मुंबईतून रिमोट पद्धतीने ओमान मधील मस्कत येतील मेडिकल सिटी हॉस्पिटल मध्ये दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या 55 वर्षीय महिलेवर यशस्वीपणे रोबोटिक रॅडिकल नेफ्रेक्टोमी (किडनी काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया) यशस्वी केली. प्रगत अशा मेटबाॅट तोमाई रोबोटिक सर्जरी सिस्टीम द्वारे केलेली देशातली पहिली बॉर्डर रिमोट सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी ठरलेली आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हे भारतातील रोबोटिक सर्जरीचे प्रमुख केंद्र असून देशातील पहिली मेडबाॅट तोमाई रोबोटिक सर्जरी सिस्टीम येथे कार्यरत आहे.

 श्रीरंग काटेकर सातारा

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !