आदर्श कामगार हाच उद्योगाचा कणा -जिवाजीराव मोहिते

आदर्श कामगार पुरस्कारांचे वितरण

Ideal worker award, 1 May, kamgar din, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

१ मे कामगार दिनानिमित्ताने दिल्या जाणारे आदर्श कामगार पुरस्कारांचे वितरण अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी  जिवाजीराव मोहिते साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सभासद असणाऱ्या व कला क्रीडा, पर्यावरण सामाजिक, सांस्कृतिक व कंपनी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते अशी माहिती  गजानन घाडगे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  जिवाजीराव मोहिते साहेब यांचा सत्कार अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी केला. प्रतिष्ठानची स्थापना व पुरस्कार वितरणा मागील भूमिका संस्थापक गोपाळराव खजुरे व दिलिपराव चरेगावकर यांनी स्पष्ट केली.

सातारा येथील ज्येष्ठ उद्योजक सुभाष दोशी यांचा सामाजिक व व्यवसायातील विशेष कार्यासाठी गौरविण्यात आले. आदर्श कामगार पुरस्कार प्राप्त व सामाजिक कार्यकर्ते  रविंद्र पवार यांच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल श्री मोहिते साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

सौ रुपाली शहाजी कुंभार (काटदरे फुड प्रॉडक्ट्स प्रा लि सातारा),  महेंद्र एकनाथ जाधव  ( अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्या.शेंद्रे, सातारा),  सर्जेराव बाळू कोंडके (गरवारे टेक्निकल फायबर्स लि., वाई),  चंद्रकांत छबन जाधव (गोदरेज ॲड बॉईज मॅन्यु.कं.लि.मोटर्स सोलूशन, शिंदेवाडी, (ता.खंडाळा, जि.सातारा)  किरण निवृत्ती नायकवडी (गरवारे टेक्निकल फायबर्स, वाई),  बाळू किसनराव शेडगे (गोदरेज ॲड बॉईज मॅन्यु.कं.लि.मोटार्स सोलूशन शिंदेवाडी, खंडाळा,जि.सातारा) यांना आदर्श कामगार पुरस्कार वितरण  जिवाजी मोहिते साहेब मॅनेजिंग डायरेक्टर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. 

ना.श्री छ शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र शासन) यांनी शुभसंदेश देऊन अभिनंदन केले. आदर्श कामगार हा उद्योगाचा कणा असून, कंपनी व देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहे असे गौरवोद्गार  जिवाजी मोहिते साहेब यांनी काढले. प्रतिष्ठान करीत असलेले काम मोलाचं आहे असून जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे असे ही ते म्हणाले. अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी आस्थापन व कामगार यांच्यातील दरी कमी करुन, उद्योगासाठी पोषक वातावरण या पुरस्कारांमुळे होते असे सांगितले.

आदर्श कामगारांचा परिचय विकास धुमाळ, हेमंत ढवळे, विठ्ठल तांबे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  इकबाल काझी यांनी केले. कार्यक्रमासाठी काटदरे फुड प्रॉडक्ट्सचे अनिलराव व शैलजा काटदरे, अभिजात इक्विपमेंटचे  सचिन दोशी, गरवारे टेक्निकल फायबर्सचे अंशुमन जगदाळे, जेष्ठ पत्रकार शरद महाजनी, मुकुंद फडके, मधुसूदन पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक, मित्र मंडळ, आस्थापनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अमृत साळुंखे, सरचिटणीस दादासाहेब काळे,संजय पवार, शरदराव वाघमळे , संजय गिरी यांनी परिश्रम घेतले. शंकरराव मांढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !