प्रशासनाकडून तत्काळ मदतीचे आश्वासन
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथील मौजे भोगाव (नेहर वस्ती) परिसरात अलीकडेच झालेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, सुनील नारायण येवले यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे घर उघडे पडले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे घरातील धान्य तसेच दैनंदिन वापरातील साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून संबंधित कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे.
घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे व गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व शासनाच्या विविध योजनांमधून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीदरम्यान भोगाव येथील तलाठी शितल वाघ, ग्रामपंचायत अधिकारी योगेश खोपडे तसेच महसूल सेवक दत्ता काळे उपस्थित होते. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला असून, लवकरात लवकर मदत मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




