वाई तालुक्यात केबल चोरीचा पर्दाफाश

आरोपीकडून २.९६. लाखांचा मुद्देमाल जप्त

Cable theft exposed,Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्यातील विविध भागात सुरू असलेल्या केबल चोरीच्या घटनांना अखेर आळा बसला असून स्थानिक शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि वाई पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ लाख ९६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २८ मार्च रोजी आसरे गावातील शेतकऱ्यांनी संशयित व्यक्तीला केबल चोरी करताना पकडून ठेवले असल्याची माहिती वाई पोलीस ठाण्यास मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी अक्षय विलास गायकवाड (रा. वणे अंगापूर, ता. सातारा) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आसरें, आकोशी व कोंडवली परिसरात केबल चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून त्याचे MH 11 DK 3597 क्रमांकाचे वाहन जप्त केले असून पुढील तपासात त्याच्याकडून ७६० मीटर लांबीची केबल व ४३ किलो तांब्याची तार असा एकूण २.९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात विविध गुन्हे नोंद असून भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तपास पथक प्रमुख सुधीर वाळुंज श्रवण राठोड, नितीन कदम, हेमंत शिंदे,  इथापे व पोलीस पाटील संदेश वैराट गणेश जरंडे सचिन सणस व आसरे गावचे शेतकरी स त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली. स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही कारवाई अधिक प्रभावी ठरली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले असून पुढील तपास पोलीस हवालदार इथापे करीत आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !