शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यांसाठी आता न्यायालयीन लढा

१२ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये मार्गदर्शन मेळावा

Seek guidance, Chhatrapati Sambhaji Nagar, vaijapur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)

शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचा पुढाकार; ॲड. प्रतीक्षा काळे मांडणार कायदेशीर बाजू, शेतकरी बांधवांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि हक्काचा प्रश्न असलेल्या शेत रस्ते, शिवरस्ते व पाणंद रस्त्यांच्या समस्यांवर आता न्यायालयीन मार्गाने ठोस तोडगा काढण्यासाठी 'शिव पाणंद शेतरस्ता चळवळी'च्या वतीने विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील प्रशासकीय विश्रामगृह येथे संपन्न होणार आहे.

कायदेशीर लढ्याची दिशा ठरणार प्रभावी अनेक वर्षांपासून शेतकरी आपल्या हक्काच्या रस्त्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत, परंतु अनेक ठिकाणी अद्यापही न्याय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत न्यायालयीन लढा हाच एकमेव प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो. याच उद्देशाने, शेतकऱ्यांना या लढ्याची योग्य दिशा मिळावी आणि त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार समजावेत, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

तज्ज्ञ वकिलांचे मिळणार मार्गदर्शन या मेळाव्यात उच्च न्यायालयातील नामांकित ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे या उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

शेत रस्त्यांशी संबंधित कायदेशीर हक्क आणि सरकारी तरतुदी.

न्यायालयात याचिका किंवा केस कशी दाखल करावी?

दाव्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया.

प्रभावी कायदेशीर उपाययोजना आणि तांत्रिक बाबी.

ॲड. काळे यांनी उच्च न्यायालयात अनेक शेतकऱ्यांना रस्ते मिळवून देण्यात मिळवलेले यश, या मेळाव्यातील मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

एकजुटीने लढा देण्याचे आवाहन शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे या मेळाव्याचे नेतृत्व करणार असून, ते शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन करणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचा आणि दर्जेदार शेतरस्ता मिळवून देणे हेच या चळवळीचे मुख्य ध्येय आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रभरातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शरद पवळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !