आसरे येथे समाधान शिबीर मेळावा उत्साहात - एकाच छताखाली ४१५ शासकीय लाभांचे वाटप

सर्व जातीचे दाखले देण्यासाठी महसूल प्रशासन कटिबद्ध - डॉ योगेश खरमाटे

Samadhan Camp Gathering, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

शासनाच्या विविध योजना व सेवा थेट ग्रामस्थांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर  आसरे येथे उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले या शिबिराला पश्चिम भागातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला 

सदर शिबिर हे   उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असून सदर शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये  करण्यात आलेल्या कामकाजाचा तपशील पुढीलप्रमाणे आधार कार्ड अपडेशन २३, सातबारा उतारे १६५, खाते उतारे ३५, फेरफार नोंदी ४७,फार्मर आयडी ११, रेशन कार्ड संबंधित सेवा १७, कुणबी प्रमाणपत्र ३८,डोंगरी दाखले २५,डोमासाईल प्रमाणपत्र  ३०,उत्पन्न दाखले २४, 

एकूण लाभार्थी संख्या ४१५ शिबिरात विविध प्रलंबित कामांचा वेगाने निपटारा करत नागरिकांना दिलासा देण्यात आला अनेक वर्ष प्रलंबित असलेली महसूल व इतर विभागाची प्रकरणे जागेवरच निकाली काढलेने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना व सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामुळे नागरिकांचे प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण दिसून आले 

सदर कार्यक्रमाचे नियोजन धोम मंडळाधिकारी श्रीकांत धनावडे, ग्राम महसूल अधिकारी निलेश भोसले,  शितल वाघ, संतोष जगताप पोलीस पाटील, महसूल सेवक यांनी अचूनपणे पार पाडले सदर कार्यक्रमास मौजे आसरे येथील सरपंच, सोसायटी सचिव, प्रतिष्ठित ग्रामस्थ मंडळी यांचे सहकार्य लाभले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !