जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांचा सेवापूर्ती समारोह

शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न

Agro camp for farmers, taluka agri officer, retirement ceremony, kannad, Chhatrapati Sambhaji Nagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा छ.संभाजीनगर (प्रतिनिधी मनोज चव्हाण)

दिनांक 18 एप्रिल 2026 वाकद येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय कन्नड व मातोश्री बबाई शेतकरी उत्पादक कंपनी वाकद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांचा सेवापुर्ती समारोह आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या जाणून घेऊन, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी पीक फेरपालट आंतरपीक, पारंपारिक बियाणाचा वापर, रासायनिक खताचा कमी व संतुलित वापर, कीटकनाशकांचा कमी वापर, जास्त पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकांऐवजी कमी पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकाचे उत्पादन, एल निनो (El Niño) मुळे मान्सूनचा पाऊस कमी होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दर्शवली. अशा परिस्थितीत पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हवामान अनुकूलन शेतीचा सल्ला दिला. 

कन्नड तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी  पीएम-प्रणाम (PM-PRANAM) योजना अंतर्गत रासायनिक खतांचा (युरिया, डीएपी, एनपीके) अतिवापर कमी करणे आणि त्याऐवजी सेंद्रिय किंवा पर्यायी खतांचा वापर वाढवणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून पिकाचे उत्पादन वाढवण्या चा सल्ला दिला व विविध शासकीय योजना व महाविस्तार AI ॲप बद्दल विशेष मार्गदर्शन केले व क्षेत्रीय अधिकारी यांना सूचना देऊन उपस्थित शेतकऱ्यांच्या मोबाईल मध्ये महाविस्तार प्रत्यक्ष डाऊनलोड करून घेतले. 

यावेळी सिल्लोड उपविभागाचे कृषी उपसंचालक एस.बी आघाव, मातोश्री बबन शेतकरी उत्पादक कंपनीची चेअरमन बबलू मनगटे व कंपनीचे सदस्य, म.कृ.अ.आर.व्हि. डोंगरदिवे, कार्यक्रमांचे सुत्रसंचालक उपकृषी अधिकारी दीपक बीरारे, स.कृ.अ भोकरे, राठोड,पवार, वेळे, तसेच आत्माचे ठाकरे, रहाणे व शेळके आणि गावातील महिला शेतकरी व शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !