598 प्रकरणाचा जागेवरच निपटरा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वेळे ता. वाई येथे शुक्रवार दि. 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात नागरिकांच्या तब्बल 598 प्रकरणाचा निपटरा जागेवर करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे व तहसीलदार सोनाली मिटकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडल अधिकारी तुकाराम कोळेकर, भूअभिलेख अधिकारी शैलेश साठे, पुरवठा निरीक्षक समीर मिर्झा,सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच राहुल ननावरे, पंचायत समिती सदस्य शैलेश संकपाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार,ग्राम महसूल अधिकारी वेळे शुभदा महानवर, ग्राम महसूल अधिकारी केंजळ सविता खंडागळे, ग्राम महसूल अधिकारी चांदक नीलू शेखरे, उपसरपंच केंजळ अमोल कदम, उपस्थित होते.
शिबिरामध्ये कृषी सेवा, आधार अद्ययावत, ग्रामपंचायत सेवा, स्वच्छता व बचत गट, महिला सक्षमीकरण, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी, वारस नोंदणी, उत्पन्न व जात प्रमाणपत्र, फेरफार नोंदी, संजय गांधी निराधार योजना, रेशनिंग, ग्राम सुरक्षा, आरोग्य सेवा, रोजगार हमी योजना अशा विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.
एकूणच प्रशासनाच्या या उपक्रमामुळे वेळे, भिलारवाडी गुळुंब,सुरूर, चांदक, केजळ मयुरेश्वर या परिसरातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला असून शासन तुमच्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रस्ताविक दिपक पवार व आभार श्री.कोळेकर यांनी मानले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




