तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी हे सरकार तत्पर
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परिवर्तनाची क्रांती झालेली आहे. तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी हे सरकार सदैव तत्पर आहे. त्यामुळे मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी निधी कमी पडू देणार नाही. असा ठाम विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा येथे केले. महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त सातारा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्यांची प्रतिमा स्वीकारत अभिमानाने गळ्यात निळा झेंडा अडकवून मंत्री जयकुमार गोरे यांनी समतेचा नारा दिला. यावेळेला रिपब्लिकन सेना महाराष्ट्र नेते रमेश अनिल उबाळे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांची मूर्ती व निळा गमजा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर आंबेडकर यांची मूर्ती सन्मानाने स्वीकार केल्यानंतर मंत्री गोरे हे भारावून गेले होते. या वेळेला युवा नेते नितीन शिंदे व रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी सर्वच मागासवर्गीयांनी कोणत्याही भूलथापाला बळी न पडता साथ दिली आहे.
लोकसभा विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळाले आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये संविधानाच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. रिपब्लिकन सेनेचे युवा नेते रमेश अनिल उबाळे हे आंदोलनातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांना भविष्यात खूप मोठी संधी आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामविकास मंत्री म्हणून माझ्याकडे जी जबाबदारी देण्यात येईल ती पार पाडण्यासाठी रिपब्लिकन सेनेला यापुढे ताकद दिली जाईल असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
महायुतीच्या माध्यमातून आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले, चिराग पासवान, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, युवा नेते जयदीप कवाडे, रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर, डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी अशा सर्वांची मोलाची साथ मिळाल्यामुळे सध्या सर्वत्र महायुतीच सत्तेमध्ये आहे. याची आम्हाला जाणीव असल्याचे त्यांनी मान्य केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




